गटनेतेपदी योगेश बहल

By admin | Published: March 9, 2017 04:19 AM2017-03-09T04:19:18+5:302017-03-09T04:19:18+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर योगेश मंगलसेन बहल यांची निवड केली आहे. राष्ट्रवादी दुस-या क्रमांकावर

Yogesh Behl as group leader | गटनेतेपदी योगेश बहल

गटनेतेपदी योगेश बहल

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर योगेश मंगलसेन बहल यांची निवड केली आहे. राष्ट्रवादी दुस-या क्रमांकावर असल्यामुळे राष्ट्रवादीचा गटनेता महापालिकेचा विरोधी पक्षनेता असणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी योगेश बहल यांची गटनेतेपदी निवड केली. पुण्याच्या विभागीय आयुक्तांना याबाबतचे पत्र देण्यात आले आहे.
योगेश बहल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांनी महापौर, सत्तारुढ पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष अशी विविध पदे भूषविली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षही ते होते. सध्या पक्ष प्रवक्तेपदाची धुराही ते सांभाळत आहेत. त्यांची नगरसेवकपदाची सहावी टर्म असून महापालिकेतील कामकाजाचा पंचवीस वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. यंदा ते प्रभाग क्रमांक वीस संत तुकारामनगर, महेशनगर, कासारवाडी प्रभागातून निवडून आले आहेत. दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी आणि उपमहापौरपदी कोणाची
निवड होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

१५ वर्षात राष्ट्रवादीने शहराचा कायापालाट केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकाळात राहिलेल्या कामांचा पाठपुरावा करुन पूर्ण करुन घेणार आहोत. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामांवर बोट ठेवणार आहे. विरोधाला विरोध करणार नाही. विकासकामांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असणार आहे. चुकीच्या कामांना राष्ट्रवादी प्रखर विरोध करेल.- योगेश बहल, नगरसेवक

मनसेच्या गटनेतेपदी सचिन चिखले
महापालिका निवडणुकीत मनसेला एक जागा मिळाली आहे. सचिन चिखले नगरसेवक झाले असून, गटनेतेपदी चिखले यांची निवड करावी, असे पत्र पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांना दिले आहे. सचिन चिखले हे मनसेचे शहराध्यक्ष असून, ते प्रथमच निवडून आले आहेत. पक्षाचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी ही निवड केली आहे. त्यानंतर चिखले यांनी गट नोंदणीसाठी विभागीय आयुक्तांना पत्र दिलेआहे.

Web Title: Yogesh Behl as group leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.