"तुम कानून तोड रहे हो..."; या फिल्मी डायलॉगसह हातात कोयता घेत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:29 PM2021-09-02T16:29:04+5:302021-09-02T16:30:17+5:30

सोशल मीडियावर दहशत निर्माण केल्याप्रकरणी तरुणाला अटक; कोयता जप्त 

‘You are breaking the law.. video viral on social media, police arrested youth in pimpri | "तुम कानून तोड रहे हो..."; या फिल्मी डायलॉगसह हातात कोयता घेत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

"तुम कानून तोड रहे हो..."; या फिल्मी डायलॉगसह हातात कोयता घेत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext

पिंपरी : बेकायदेशीर लोखंडी काेयता बाळगला. तसेच कोयत्याचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण केली. या प्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली.

मोशी - देहूगाव रस्त्यावर मोशी येथे बुधवारी (दि. १) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. आकाश राजाराम भिसे (वय २४, रा. मोशी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी गणेश शंकर मेदगे यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लोखंडी कोयता बेकायदेशीर बाळगला. तसेच कोयत्यासह व्हिडिओ तयार केला. ‘तूम कानून तोड रहे हो... पुरानी आदत है युवर ऑनर... वो तो बचपनसे कर रहा हूं...’, असे फिल्मी डायलाॅग असलेला कोयत्याचा तो व्हिडिओ इन्सटाग्राम या सोशल मीडिया ॲपवरून व्हायरल केला. यातून दहशत निर्माण केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार  गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने कारवाई केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून २०० रुपयांचा एक लोखंडी कोयता जप्त केला. सहायक फौजदार दीपक रणसौर तपास करीत आहेत.

Web Title: ‘You are breaking the law.. video viral on social media, police arrested youth in pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.