अपघातात तरुण ठार; बसची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:44 AM2018-04-28T06:44:58+5:302018-04-28T06:44:58+5:30
नाशिक फाटा पुलाजवळ बीआरटीएस मार्गिकेतून बस जात असताना साहेद आलम बीआरटीएस रस्ता ओलांडत होता.
पिंपरी : बीआरटीएस रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला पीएमपीबसची धडक बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी बसची तोडफोड केली. गुरुवारी रात्री साडेदहाला ही घटना घडली.
साहेद आलम (वय २०, रा. लेबर कॅम्प, काशीद, जि. रायगड) या तरुणाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्याच्या पाठीमागे आई, वडील आणि चार बहिणी आहेत. एकुलता मुलगा गमावल्याने साहेदच्या कुटुंबामध्ये दु:खाचे वातावरण आहे. साहेदच कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होता. बसचालक शशिकांत बाळकृष्ण वासाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी बस (एमएच १२ केक्यू ०९३६) ही हिंजवडी येथून भोसरीकडे जात होती. नाशिक फाटा पुलाजवळ बीआरटीएस मार्गिकेतून बस जात असताना साहेद आलम बीआरटीएस रस्ता ओलांडत होता. त्या वेळी बसने साहेदला धडक दिली. यात साहेद गंभीर जखमी झाला. त्या वेळी घटनास्थळी उपस्थित असणाºया नागरिकांनी मदतीचा हात दिला. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.