जेव्हा गाडीसह तरुणी घालते चक्क मंदिरातील नंदीसमोर लोटांगण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 07:02 PM2020-03-04T19:02:43+5:302020-03-04T19:03:25+5:30

वाकड परिसरातील महादेव नगर येथील मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मध्ये अपघात कैद

Young women two wheeler accident in temple at ravet | जेव्हा गाडीसह तरुणी घालते चक्क मंदिरातील नंदीसमोर लोटांगण 

जेव्हा गाडीसह तरुणी घालते चक्क मंदिरातील नंदीसमोर लोटांगण 

Next

रावेत : पुण्यासारख्या शहरातच काय पण गावाकडे देखील महिला सर्रास वाहन चालविताना दिसतात. कधी कधी त्यांचं गाडी चालवणं धोक्याचं देखील वाटते. सोशल मीडियावर मंगळवारपासून वाकड येथील महादेव मंदिरात घुसलेल्या दुचाकीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिरा शेजारील महादेव मंदिरासमोर हा प्रकार घडला आहे.सगळा प्रकार मंदिरातील  सीसीटीव्हीत कैद झाला आहे.एक तरुणी आपली दुचाकी चालू करून मंदिरासमोर उभी राहिली असता अचानक दुचाकींचा वेग वाढल्याने दुचाकी तरुणीसह मंदिरात घुसली.या व्हिडिओ मधील तरुणीला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र महादेव मंदिराच्या दारासमोरच दुचाकीचा वेग अती झाल्याने तरुणीचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर तरुणीने थेट मंदिराच्या पायऱ्यांवरुन गाडीसहीत मंदिरात प्रवेश करुन तिथे असलेल्या नंदीसमोर लोटांगण घातले.            वाकड परिसरातील महादेव नगर येथील मंदिरातील सिसिटीव्ही मध्ये हा अपघात कैद झाला आहे. मंगळवारी  सकाळी एक तरुणी मंदिर परिसरात कामानिमित्त आली होती. काम झाल्यानंतर परत जाण्यासाठी तरुणीनेने मंदिरासमोर दुचाकी सुरू केली. गाडी सुरु केल्यानंतर  रेसचा अंदाज न आल्याने  तरुणी दुचाकीसह वेगात मंदिरामध्ये गेली. महादेव मंदिरामधील नंदीच्या समोरच महिला जोरात पडल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.  या अपघातात सुदैवाने त्या तरुणीला  गंभीर जखम झाली नाही. तरुणीने लागलीच दुचाकी उचलण्याचा प्रयत्न केला परंतु तिला दुचाकी उचलणे शक्य होत नव्हते हा सगळा प्रकार बाजूच्या महिलेने पहिला आणि  तिच्या मदतीला आल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसते.परंतु सदर तरुणीला गाडी उचलण्यासाठी मदत करण्या ऐवजी तिच्याशी झालेल्या प्रकारा बाबत बोलताना दिसत आहे.शेवटी त्या तरुणीने स्वतःच गाडी उचलून मंदिरातून काढता पाय घेतला.

Web Title: Young women two wheeler accident in temple at ravet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.