रावेतमध्ये मोबाईलवरील पबजी खेळामुळे तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 04:05 PM2020-01-18T16:05:38+5:302020-01-18T16:06:57+5:30
मोबाइलवर पबजी गेम खेळत असताना तरुणाला झटके येऊन तो बेशुद्ध झाला.
किवळे : रावेत येथील एका २३ वर्षीय तरुणाला राहत्या घरी मोबाइलवर पबजी गेम खेळत असताना झटके येऊन तो बेशुद्ध झाला. त्यानंतर उपचारासाठी त्याला रावेत येथील एका रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
हर्षल देविदास मेमाणे (वय २३, रा. शिंदे वस्ती, रावेत, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहे. याबाबत संबंधित रुग्णालयाने पोलिसांना खबर दिली आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील हर्षल मेमाणे यांच्या एका नातेवाईक महिलेने रावेत येथील एका रुग्णालयाला दिलेल्या खबरीनुसार, गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास राहते. घरी हर्षल हा मोबाइलवर पबजी गेम खेळत होता. त्यावेळी त्याला झटके आले. यात तो बेशुद्ध झाला होता. त्यामुळे उपचारासाठी त्याला रावेत येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला, असे संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरने पोलीस ठाण्यात कळविले असल्याचे सांगण्यात आले आहे.