लोहगड किल्ल्याजवळील अष्टकोनी तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:12 IST2018-01-09T17:10:47+5:302018-01-09T17:12:10+5:30
लोहगड किल्लावरील दुपारी १.३० सुमारास शंकराच्या मंदिराशेजारी असलेल्या अष्टकोनी तलावात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

लोहगड किल्ल्याजवळील अष्टकोनी तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
पवना नगर : लोहगड किल्लावरील दुपारी १.३० सुमारास शंकराच्या मंदिराशेजारी असलेल्या अष्टकोनी तलावात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जुबेर अकबर शेख (वय २०, रा. खडकी बाजार, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
३ घरातील सर्व १३ जण एकत्रितपणे सकाळी ११.०० वाजता लोहगड येथील दर्ग्यावर आले होतो. तेथील अष्टकोनी तलावात पोहण्यासाठी गेले असता जुबेरचा तोल जाऊन तो तलावात पडला.
लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यु टिममार्फत सायंकाळी ५ वाजता त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.