ढाक भैरीच्या कड्यावरून पडून युवकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 12:34 AM2020-11-02T00:34:05+5:302020-11-02T00:34:31+5:30
Lonavala :रविवारी सकाळी ७वाजण्याच्या सुमारास ढाक भैरी येथील गुहेतून खाली उतरत असताना हात सटकल्याने तो अंदाजे २०० फुट खोल दरीत पडला होता.
लोणावळा : मावळ तालुक्यातील ढाक भैरीच्या कड्यावरून सुमारे 200 फुट खोल दरीत पडल्याने प्रचिकेत भगवान काळे (वय ३२,रा.पिंपरी चिंचवड) असे या युवकाचे नाव आहे. रविवारी सकाळी ७वाजण्याच्या सुमारास ढाक भैरी येथील गुहेतून खाली उतरत असताना हात सटकल्याने तो अंदाजे २०० फुट खोल दरीत पडला होता. त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने या दुर्घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेची माहिती समजली त्यावेळी अनिकेत बोकील व दिपक पवार हे त्याच भागातील कळकराय येथे क्लायबिंगसाठी रेकी करत होते. लगेचच ते ढाक भैरी येथील दरीकडे पोहचले. त्यानंतर कामशेतचे अनिल आंद्रे, चंद्रकांत बोंबले, शुभम आंद्रे, अविनाश केदारी हे देखील त्यांच्या मदतीला पोहचले. पायऱ्यामुळे प्रचिकेतचे मित्र व इतर ग्रुपचे सदस्य पण खाली पोहचले होते. पण मार लागल्याने काहीच क्षणात त्याचा श्वास थांबला होता.
शिवदुर्गची टीम देखील सर्व साहित्यांची जुळवाजुळव करत ढाकच्या दिशेने निघाली. कामशेत पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची कल्पना दिली. तोपर्यत अनिकेत व दिपक ने हालचाल करुन बॉडी पॅक केली व वर खेचण्यासाठी सेट अप लावला. या प्रकारच्या रेस्क्यूला फार मोठी टीम लागते. टेक्निकल टीम टेक्निकल काम करते पण मृतदेह पुढे उचलून गाडीपर्यंत आणणे खुपच जिकीरीचे असते. आजच्या रेस्क्युला सर्वच ट्रेकर्स ग्रुपनी खूप सहकार्य केले.
अनिकेत बोकील, दिपक पवार, अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, अविनाश केदारी, चंद्रकांत बोंबले, रसिक काळे, रोहीत वर्तक, ओंकार पडवळ, अशोक उंबरे, सतिष मेलगाडे, महेश मसणे, गणेश गिद, विशाल मोरे, नेहा गिद, प्रियंका मोरे, नुतन पवार, ब्रिजेश ठाकुर ,अनिकेत आंबेकर, ओंकार म्हाळसकर, गोपाळ भंडारी, सुनिल गायकवाड यांनी सदरचा रेस्क्यू करत प्रचिकेतचा मृतदेह बाहेर काढला.