अपहरणकर्त्यांच्या तावडीतून तरुणाची सुटका ; आरोपी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 10:39 PM2019-04-22T22:39:21+5:302019-04-22T22:41:19+5:30

पैशाच्या वादातून तळेगाव दाभाडे येथून अपहरण केलेल्या तरुणाची गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सुटका केली असून आरोपींना अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे.

Youth rescued from kidnappers; Detained accused | अपहरणकर्त्यांच्या तावडीतून तरुणाची सुटका ; आरोपी ताब्यात

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून तरुणाची सुटका ; आरोपी ताब्यात

Next

पिंपरी : पैशाच्या वादातून तळेगाव दाभाडे येथून अपहरण केलेल्या तरुणाची गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सुटका केली असून आरोपींना अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे. 

तुलसीदास विश्वनाथ बोरुडे, दिलीप रंगनाथ गायकवाड, संभाजी आबादेव कराळे (सर्व रा. मु.पो. आगडगाव, ता.जि. अहमदनगर), पांडुरंग लक्ष्मण कोतकर (रा. राळेगण म्हसोबा, जि. अहमदनगर, सध्या रा. तळेगाव ढमढेरे), सुनील बाळासाहेब हेंगसे (रा. आनंद ग्राम सोसायटी, तळेगाव ढमढेरे), जितेंद्र रामचंद्र पळसे (रा. पाटवस्ती, शिक्रापूर) अशी आरोपींची नावे आहेत.  

योगेश दत्तू गायकवाड (वय २५, रा. सेवडी, जि. अहमदनगर) असे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे येथील त्यांच्या मैत्रीणीने फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी व त्यांचे मित्र योगेश गायकवाड हे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील सिटी क्रिस्टल इमारत येथील सातव्या मजल्यावर फ्लॅट नंबर ७०४ येथे घरसामान शिफ्ट करीत असताना एक पांढरया रंगाची मोटार इमारतीसमोर आली. त्यातील तीन ते चार व्यक्तींनी खाली उतरुन योगेश गायकवाड यांना मोटारीत बसवून पळवून नेले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. 

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक तपास करीत असताना यातील आरोपी अहमदनगर येथील निंबुर्डी गावातील बेरड वस्ती येथील एका बंद घरात अपह्त योगेश गायकवाड यांच्यासह असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रात्रीच्यावेळी घरास वेढा घालून आरोपींना ताब्यात घेतले. 

पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी सांगितले की, गायकवाड याने नोकरीचे आमिष दाखवून आरोपींकडून पैसे घेतले होते, अनेक दिवस उलटूनही नोकरी न लावल्याने आरोपी त्याच्याकडे पैसे मागत होते.  मात्र, गायकवाड पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे आरोपींनी त्याचे अपहरण केले होते.

 

Web Title: Youth rescued from kidnappers; Detained accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.