Pimpri Chinchwad Crime | पाठलाग करत तरुणावर दोनदा गोळीबार, वराळे गावातील घटना
By रोशन मोरे | Updated: April 1, 2023 18:00 IST2023-04-01T17:58:51+5:302023-04-01T18:00:18+5:30
पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करत चार जणांना अटक केली...

Pimpri Chinchwad Crime | पाठलाग करत तरुणावर दोनदा गोळीबार, वराळे गावातील घटना
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून जमाव जमवून सहा जणांनी तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर दोनदा गोळीबार केला. तसेच त्याच्या कारची तोडफोड करत दहशहत निर्माण केली. ही घटना गुरुवारी (दि.३०) वराळे गाव च्या हद्दीतील समता कॉलनी येथे घडली. या प्रकरणी उदय अशोक लोंढे (वय २३, रा. समताकॉलनी) यांनी शनिवारी (दि.३१) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करत चार जणांना अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपींचे नाव अनिल जगन जाधव (वय २३), संजय ज्ञानेश्वर माळवदकर (वय २४, ), कुमार सुरेश मोहीते ( तिघे रा. तळेगाव दाभाडे), हर्ष उर्फे सोन्या प्रमोद साठे (वय १९, रा. वडगाव) अशी आहेत. तर, गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची बापू रीठे ( रा. वडगाव मावळ), रोहन उर्फे चिक्या शिंदे (तळेगाव दाभाडे) अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यामधील जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी हातात पिस्तुल व कोयत्या अशी हत्यार घेत फिर्यादीचा पाठलाग केला. आरोपीला जीवे मारण्यासाठी आरोपींनी दोनदा पिस्तूल मधून फायर केले. मात्र, फिर्यादी लांब असल्याने त्याला गोळ्या लागल्या नाहीत. तो पळत जाऊन घरात लपवला असता आरोपींनी घराच्या बाहेर लावलेल्या फिर्यादीच्या कारची तोडफोड करत दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.