युवकांनी करावी मतदानाविषयी जागृती

By admin | Published: January 26, 2017 12:23 AM2017-01-26T00:23:14+5:302017-01-26T00:23:14+5:30

भारत हे लोकशाही राष्ट्र असून, लोकशाहीमध्ये जनतेला आपला प्रतिनिधी निवडण्याचा हक्क असतो. महाविद्यालयीन युवक हा मतदानाचा महत्वाचा घटक

Youth should raise awareness about voting | युवकांनी करावी मतदानाविषयी जागृती

युवकांनी करावी मतदानाविषयी जागृती

Next

पिंपरी : भारत हे लोकशाही राष्ट्र असून, लोकशाहीमध्ये जनतेला आपला प्रतिनिधी निवडण्याचा हक्क असतो. महाविद्यालयीन युवक हा मतदानाचा महत्वाचा घटक असून, देशाचे भवितव्य घडविणे त्यांच्या हातात असते. तेव्हा युवकांनी जनतेमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात मतदान करणेबाबत जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय-पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी यांच्या सहकार्याने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त युवा महोत्सवातील विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करताना ते बोलत होते.
आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्रकार, उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले, सह आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने, अण्णा बादडे, माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी अलका कांबळे, तहसीलदार महेश पाटील, पल्लवी घाटगे, नायब तहसीलदार स्नेहा चाबुकस्वार, तसेच सुषमा पैकीकरी, अंजली सावंत, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, परीक्षक सविता कुलकर्णी, श्याम लांडगे, रमेश वाकनीस, सुनील देशपांडे, सतीश परदेशी, रंजिता चॅटर्जी, डॉ.सुधीर बोराटे, प्रा. रामदास लाड, दीप्ती यादव, नम्रता आल्हाट आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Youth should raise awareness about voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.