हरित मार्गासाठी युवकांचा पुढाकार

By admin | Published: June 26, 2017 03:33 AM2017-06-26T03:33:49+5:302017-06-26T03:33:49+5:30

देहू-पंढरपूर हरीत मार्गासाठी बारामतीच्या युवकांनी पुढाकार घेतला आहे. विठ्ठलभेटीची आस लागलेल्या वारकऱ्यांबरोबर

Youth's initiative for Green Road | हरित मार्गासाठी युवकांचा पुढाकार

हरित मार्गासाठी युवकांचा पुढाकार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : देहू-पंढरपूर हरीत मार्गासाठी बारामतीच्या युवकांनी पुढाकार घेतला आहे. विठ्ठलभेटीची आस लागलेल्या वारकऱ्यांबरोबर पर्यावरणाची आस असलेल्या युवकांनी एकत्रित येउन निसर्गसंवर्धनासाठी आगळावेगळा उपक्रम राबविला. विठोबाच्या भेटीसाठी वारीत निघालेल्या वारकऱ्यांचे देहभान हरपते, त्याप्रमाणे हे युवक पर्यावरणाच्या ध्यासातून पायी चालून हा उपक्रम राबवित आहेत. या युवकांची पर्यावरणवारी परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
बारामती येथील नेचर फें्रड्स आर्गनायझेशनच्या युवकांनी संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना सीडबॉलसह बिया वाटपाचा उपक्रम राबविला. या वेळी १० हजारांहून अधिक सीडबॉल, तर ८ लाख बियांचे वाटप करण्यात आले. पर्यावरणसंवर्धनामध्ये वृक्षसंवर्धनाचे वाढते महत्त्व पाहून युवकांनी हा उपक्रम राबविला. देशी झाडांचे संवर्धन पशुपक्ष्यांसाठी अधिक उपयुक्त आहे. या पार्श्वभूमीवर युवकांनी करंज, अर्जुन, शेवगा, कडुनिंब, चिंच, जांभूळ, हादगा, शेवगा आदी झाडांच्या बिया, सीडबॉलवाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी युवकांनी गेल्या ६ महिन्यांपासून पूर्वतयारी केली होती. शहरातील ५ विद्यालयांमधील शालेय विद्यार्थ्यांना बियासंकलनासाठी सहभागी करण्यात आले होते. बियासंकलनासाठी सीड बँकेचादेखील उपक्रम विद्यार्थ्यांनी राबविला. त्यामुळे लाखाच्या संख्येत बियासंकलन करणे शक्य झाले.
यंदा उंडवडीपासून काटेवाडीपर्यंत सीडबॉल, बियावाटप करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी युवकांनी थेट दिंंड्यांशी संवाद साधला. या
उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले. बीजारोपणासाठी लाखो हात एकत्र आल्यास देहू-पंढरपूर हरित मार्ग बनण्यास मदत होईल, असे युवकांनी वारकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.
कांबळे यांच्यासह सचिन जानराव, श्रीकांत पवार, कार्तिक शहा, अक्षय गांधी, पारस मेहता, सोमेश बांदल, कुणाल टिळेकर, आनंद सोनवणे, सचिन गायकवाड, चिकू सरोदे, अक्षय बिरदवडे, किरण कर्वे, सुमित गांधी, सोनाली क्षीरसागर या युवकांनी उपक्रमामध्ये सहभाग घेतला.

Web Title: Youth's initiative for Green Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.