शून्य कचरा मोहीम देहूरोडला राबविणार, देहूरोड कॅन्टोन्मेंट, दोनशे कचराकुंड्या घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 02:42 AM2017-09-16T02:42:44+5:302017-09-16T02:43:10+5:30
स्वच्छ भारत अभियानाच्या तिसºया वर्धापन दिनानिमित्त ‘स्वच्छताही सेवा’ हा संदेश देत स्वच्छतेसाठी जनआंदोलन गतिमान करण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने गांधी जयंतीपर्यंत चालणा-या स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. कॅन्टोन्मेंट हद्दीत शून्य कचरा मोहीम राबविण्यात येणार आहे.
देहूरोड : स्वच्छ भारत अभियानाच्या तिसºया वर्धापन दिनानिमित्त ‘स्वच्छताही सेवा’ हा संदेश देत स्वच्छतेसाठी जनआंदोलन गतिमान करण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने गांधी जयंतीपर्यंत चालणा-या स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. कॅन्टोन्मेंट हद्दीत शून्य कचरा मोहीम राबविण्यात येणार आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते अभियानाचा प्रारंभ झाला. आमदार संजय भेगडे, बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, सदस्य रघुवीर शेलार, सारिका नाईकनवरे, हाजीमलंग मारिमुत्तू, ललित बालघरे, अॅड. अरुणा पिंजण, लष्करी मुख्यालयाचे कर्नल प्रदीप सिंग यांच्यासह माजी उपाध्यक्ष मदनलाल सोनिगरा, सुनंदा आवळे, देहूरोड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अॅड. कृष्णा दाभोळे, भाजपाचे शहराध्यक्ष अॅड. कैलास पानसरे, शिवसेना विभागप्रमुख सुनील हगवणे, लहू शेलार, बाळासाहेब झंजाड, रमेश जाधव, मधुकर काळोखे, तुकाराम जाधव, बाळासाहेब जाधव, परिसरातील नागरिक, व्यापारी, बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सानप यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. आमदार भेगडे, सीईओ सानप, उपाध्यक्ष खंडेलवाल यांनी सदस्य पिंजण, बालघरे, नाईकनवरे यांनी हाती झाडू घेऊन कार्यालय परिसरात साफसफाई केली.
स्वच्छता राखणे ही केवळ कॅन्टोन्मेंटची जबाबदारी नसून, सर्वांची जबाबदारी आहे. संरक्षण विभागाच्या परिसरात स्वच्छता दिसून येते. मात्र नागरी भागात अस्वच्छता दिसते. विद्यार्थ्यांनी सक्षम नागरिक होण्यासाठी स्वच्छतेवर भर द्यावा, असे प्रतिपादन खासदार बारणे यांनी देहूरोड येथे केले. आमदार भेगडे यांनी स्वच्छता अभियान एक चळवळ
बनली असून, सर्वांनी यात
सहभागी व्हावे, असे आवाहन केले. उपाध्यक्ष खंडेलवाल यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील गुरव यांनी सूत्रसंचालन केले. सदस्य शेलार यांनी आभार व्यक्त केले. कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत, अधिकारी व कर्मचारी यांनी संयोजन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सानप यांनी स्वच्छतेची शपथ दिली.
जनजागृती रॅली : परिसराची स्वच्छता
स्वच्छ भारत अभियानाच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळांतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी, बोर्डातील सर्व अधिकारी, पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व बोर्ड कर्मचा-यांसह देहूरोड बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या हातात स्वच्छतेचा संदेश देणारे फलक झळकत होते. अभियानाच्या पहिल्या दिवशी कॅन्टोन्मेंट कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला. बाजारपेठ, मंडई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय समोरचा भाग, मुंबई-पुणे महामार्ग भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता जनजागृतीसाठी ध्वनिक्षेपकावरून सातही वॉर्डांत सूचना देण्यात येत होत्या.
सीईओ सानप म्हणाले, ‘‘अभियान काळात अधिक काम करण्यात येणार आहे. सर्वांनी घंटागाडी व कचराकुंडीचा वापर करावा. दोनशे कचराकुंड्या घेण्यात येणार असून प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर कचराकुंडी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शून्य कचरा मोहीम राबविण्यात येणार आहे. संबंधित भागातच मशिनच्या साह्याने कचºयावर प्रक्रिया करणार आहोत. कचरा वर्गीकरण करण्यात येणार आहे. डिसेंबरअखेर ४०० शौचालये उभारण्यात येणार आहेत. देहूरोड प्लॅस्टिकमुक्त करणार आहे. प्लॅस्टिकचा वापर रस्त्यासाठी करण्यात येणार आहे.