जिल्हा परिषदेकडून मिळणार होडी,नदीवर लवकरच उभारणार पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:42 AM2018-06-17T00:42:46+5:302018-06-17T00:42:46+5:30

नाणोली व वराळे गावातील शेतकरी व महिलांबरोबर शाळेसाठी विद्यार्थ्यांना होडीतून धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे.

Zilla Parishad to get the boat ready | जिल्हा परिषदेकडून मिळणार होडी,नदीवर लवकरच उभारणार पूल

जिल्हा परिषदेकडून मिळणार होडी,नदीवर लवकरच उभारणार पूल

Next

वडगाव मावळ : नाणोली व वराळे गावातील शेतकरी व महिलांबरोबर शाळेसाठी विद्यार्थ्यांना होडीतून धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा मागणी करूनही या नदीवर पूल उभारला जात नसल्याने तीन पिढ्यांपासून विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेसाठी कसरत करावी लागते.
याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये विद्यार्थ्यांचा होडीतून धोकादायक प्रवास या मथळ््याखाली शनिवारी प्रसिद्ध झाले. त्याची दखल मावळ तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी घेतली असून, हा प्रश्न सोडविण्यात येईल, तसेच जिल्हा परिषदेकडून नवीन होडी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. अचानक पाऊस वाढल्यास नदीला पूर येतो, त्यावेळी आपत्कालीन व आणीबाणीच्या परिस्थिती प्रवाशांना वाचविण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था याठिकाणी नाही.
> वराळे-नाणोली पूल हा ग्रामीण मार्गावर आहे. शासनाच्या नियमानुसार नाबार्ड योजनेंतर्गत मंजुरी मिळावी लागते. या वर्षीच्या अंदाजपत्रकात हा पूल प्रस्तावित आहे. एक महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच नवीन होडी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- बाळा भेगडे, आमदार
>सदरची होडी ही धोकादायक आहे. जिल्हा परिषदेच्या फंडातून दीड महिन्यात नवीन होडी आणण्यात येईल. आमदार बाळा भेगडे याच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री यांची भेट घेऊन पुलाच्या संदर्भांत प्रश्न मार्गी लावला जाईल.
- नितीन मराठे,
जिल्हा परिषद सदस्य
>ही होडी निकामी झाली असून, विद्यार्थी, शेतकरी प्रवास करतात. होडीमुळे धोका होऊ शकतो. नवीन होडी लवकर मिळावी व पुलाचे काम लवकर झाले पाहिजे.
- ज्योती शिंदे,
पंचायत समिती सदस्या
>पुलाचे भूमिपूजन पन्नास वर्षांपूर्वी झाले. मात्र अद्याप पूल झाला नाही. शेतकरी, विद्यार्थी जीव धोक्यात घालून प्रवास करतात. पुलाचे काम जलद गतीने झाले पाहिजे.
- अनिता लोंढे, नाणोली सरपंच
>नाणोलीतर्फे चाकण या भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासून अडचण आहे. दळणवळणासाठी ५ ते ६ किलोमीटरचा वळसा पडतो. ही अडचण लक्षात घेऊन आमदार बाळा भेगडे यांनी हा पूल मंजूर करून घेतला आहे. ‘लोकमत’ने खरी समस्या मांडली होडी निकामी झाली आहे. पंचायत समितीत नवीन होडीसाठी ठराव करून जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येईल.
- गुलाबराव म्हाळसकर, सभापती
- धोंडिबा मराठे, माजी सभापती

Web Title: Zilla Parishad to get the boat ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.