खडसेंचा दणका, भाजपला खिंडार; ३१ आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 08:56 AM2021-02-14T08:56:44+5:302021-02-14T08:57:17+5:30

Eknath Khadse 18 bjp corporators joins NCP: पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. खडसे समर्थक ३१ आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे

(18 bjp corporators joins NCP in the presence of Eknath Khadse in jalgaon | खडसेंचा दणका, भाजपला खिंडार; ३१ आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

खडसेंचा दणका, भाजपला खिंडार; ३१ आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Next

जळगाव: भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपला खिंडार पाडलं आहे. भाजपमधील खडसे समर्थक नेते आणि कार्यकर्ते आता राष्ट्रवादीची वाट धरू लागले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपला गळती लागली आहे. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलेल्या खडसेंची सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशी सुरू आहे. एका बाजूला चौकशीचा सिलसिला सुरू असताना दुसरीकडे खडसेंनी भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. (18 bjp corporators joins NCP in the presence of Eknath Khadse)

भुसावळमधील तब्बल ३१ आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. यामध्ये १८ विद्यमान आणि १३ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. या नगरसेवकांच्या कुटुंबीयांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा; “माझा छळ करणं तुम्हाला महागात पडेल, जेवढं छळाल तेवढं...”

मला जितकं छळाल, तितकं भाजपचं नुकसान होईल. माझा छळ भाजपला महागात पडेल, असा इशारा खडसेंनी नुकताच भाजपला दिला होता. ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर खडसेंनी दिलेला इशारा अतिशय सूचक होता. यानंतर लगेचच भाजपमधील आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी सौ. भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे आणि अनेक आजी-माजी नगसेवकांचा समावेश आहे.

"ईडी लावली तर, सीडी लावेन असं गमतीनं म्हटलेलं, पण आता..."

काय म्हणाले एकनाथ खडसे?
आज कार्यकर्ते भाजपा सोडतायेत, त्यांच्या मनात असुरक्षितता आहे, इतकं करूनही नाथाभाऊला न्याय मिळाला नाही, त्यांच्यामागे ईडी लावली जातेय, काय काय धंदे केले जातात, नाथाभाऊंना कसं तुरुंगात टाकता येईल असं बघितलं जातं आहे, पण मी कधीही आयुष्यात धंदे केले नाहीत, आयुष्यात कधीही २ नंबरच्या धंद्यात पडलो नाही, अख्ख्या जळगाव जिल्ह्यात कोणीही सांगावं कोणाकडून नोकरीसाठी पैसे घेतलेत, कामासाठी पैसे घेतलेत, एकाने उभं राहावं आणि सांगावं नाथाभाऊ खोटं बोलतायेत असं आव्हान त्यांनी दिले.

...आता मी सीडी लावण्याचं काम करणार
मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा जयंत पाटलांसह अनेकांनी मला सांगितलं तुमच्या मागे ईडी लागू शकते, त्यावर मी प्रवेश मेळाव्यात म्हटलं होतं, माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन. परंतु आता माझ्यामागे प्रत्यक्षात ईडीची चौकशी लावली आहे, त्यामुळे मी सीडी लावण्याचं काम करणार आहे असं म्हणत खडसेंनी भाजपाला गंभीर इशारा दिला.

माझा गुन्हा काय आहे?
"मी विधानसभेच्या सभागृहात वारंवार विचारत आलो, माझा गुन्हा काय आहे? पण मला शेवटपर्यंत उत्तर दिले नाही. मी खूप संघर्ष केला. संघर्ष हा माझा स्थायी स्वभाव आहे. मात्र पाठीमागे खंजीर खुपसण्याचे काम मी कधी केले नाही. मी समोरासमोर लढलो. कधी विद्वेषाची भावना मनात ठेवली नाही. महिलेला समोर करून मी कधीही राजकारण केले नाही असं सांगताना एकनाथ खडसेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) टीका केली.
 

Web Title: (18 bjp corporators joins NCP in the presence of Eknath Khadse in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.