2 Years of Modi 2.0: २०२४ ला पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत का?; बघा, किती टक्के जनता म्हणते 'हो'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 11:13 AM2021-05-31T11:13:41+5:302021-05-31T11:15:27+5:30

Lokmat Survey: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशाने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भरवसा ठेऊन दुसऱ्यांचा सत्ता भाजपाच्या हाती दिली.

2 Years of Modi 2.0: Should Narendra Modi be the PM again in 2024? | 2 Years of Modi 2.0: २०२४ ला पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत का?; बघा, किती टक्के जनता म्हणते 'हो'

2 Years of Modi 2.0: २०२४ ला पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत का?; बघा, किती टक्के जनता म्हणते 'हो'

googlenewsNext
ठळक मुद्देविरोधकांनी आक्रमकपणे सरकारच्या धोरणांवर टीका करणं सुरू केले आहे.पश्चिम बंगालमध्ये साम-दाम-दंड भेद वापरूनही भाजपाच्या पदरी निराशा पडली आहे. मोदी सरकारच्या कारर्किर्दीला ७ वर्ष पूर्ण, वाचकांनी मांडली मते

मुंबई – २०१४ मध्ये नरेंद्र मोदी लाटेने काँग्रेसचं सरकार उद्ध्वस्त केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशानं भारतीय जनता पार्टी देशभरात सर्वात मोठी पार्टी बनली. एकेकाळी याच भाजपाचे लोकसभेत २ खासदार निवडून आले होते परंतु आता लोकसभेत भाजपा नंबर एक आहे. २०१४ पासून देशात मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास काश्मीरमधील कलम ३७० हटवणे, नागरिकत्व सुधारणा कायदा, सर्जिकल स्ट्राईक, जीएसटी, कृषी कायदे असे धाडसीचे निर्णय घेतले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशाने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भरवसा ठेऊन दुसऱ्यांचा सत्ता भाजपाच्या हाती दिली. सध्या देशात कोरोनाचं वातावरण आहे. यातच काही प्रमाणात विरोधकांनी आक्रमकपणे सरकारच्या धोरणांवर टीका करणं सुरू केले आहे. स्थानिक निवडणुकींमध्ये भाजपाला फटका बसत आहे. पश्चिम बंगालमध्ये साम-दाम-दंड भेद वापरूनही भाजपाच्या पदरी निराशा पडली आहे. यातच मोदी सरकारच्या कारकिर्दीला आज ७ वर्ष पूर्ण होत आहेत.

या ७ वर्षाच्या मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल लोकमत समुहाने वाचकांचा ऑनलाईन सर्व्हे घेतला. या सर्व्हेनुसार मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल किती स्टार द्याल, येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजपाला किती जागा मिळतील? २०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत असं वाटतं का? मोदी सरकार कोरोनाचं संकट योग्यरित्या हाताळत आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय योग्य होता की नाही? असे विविध प्रश्न वाचकांना विचारण्यात आले होते.

या मोदी सरकारच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीला तुम्ही किती स्टार द्याल? या प्रश्नावर ३६.४२ टक्के लोकांनी १ स्टार दिला आहे. म्हणजेच ३६.४२ टक्के लोक मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाहीत. १४.९३ टक्के लोकांनी २ स्टार दिलेत, १०.७८ टक्के लोकांनी ३ स्टार दिलेत. १४.३७ टक्के लोकांनी ४ स्टार दिलेत. तर २३.५० टक्के लोकांनी ५ स्टार देत मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

सध्या लोकसभेत भाजपाचे स्वत:च्या बळावर ३०३ खासदार निवडून आले आहेत. बहुमतासाठी भाजपाला इतर कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही. त्यामुळे अकाली दल आणि शिवसेना हे पक्ष एनडीए(NDA)तून बाहेर पडल्यानंतरही मोदी सरकारला कोणताही धोका नाही. परंतु येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपाला किती जागा मिळतील? असा प्रश्न वाचकांना केला होता. त्यावर अत्यंत चुरस पाहायला मिळाली. जवळपास २७.९५ टक्के लोकांनी ०-१०० यामध्ये जागा मिळतील असा दावा केला तर २७.१९ टक्के लोकांनी ३०१-४०० पर्यंत जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला. तर २५.९१ टक्के लोकांनी भाजपाला १०१-२०० या दरम्यान जागा मिळतील असं म्हटलं आहे. त्याचसोबत १८.९५ टक्के लोकांनी २०१-३०० यामध्ये भाजपाला जागा मिळतील असं सांगितले आहे.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे २०२४ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत, असं वाटतं का? असा प्रश्न वाचकांना केला होता. त्यावर ५२.५९ टक्के लोकांनी नकार दिला आहे आणि ४३.६१ टक्के लोकांना नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत असं वाटत आहे तर ३.८१ टक्के लोकांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनणार का? हे येणारा काळच सांगू शकेल.

Web Title: 2 Years of Modi 2.0: Should Narendra Modi be the PM again in 2024?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.