कोल्हापूरच्या कामगारांकडून कन्हैयाकुमारला ५० हजारांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 05:35 AM2019-04-14T05:35:44+5:302019-04-14T05:36:24+5:30

बेगुसराय (बिहार) मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेल्या कन्हैयाकुमार यांच्या मदतीला कोल्हापुरातील कामगार धावून आले आहेत.

50 thousand support from Kanhaiyakumar from Kolhapur workers | कोल्हापूरच्या कामगारांकडून कन्हैयाकुमारला ५० हजारांची मदत

कोल्हापूरच्या कामगारांकडून कन्हैयाकुमारला ५० हजारांची मदत

googlenewsNext

कोल्हापूर : बेगुसराय (बिहार) मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेल्या कन्हैयाकुमार यांच्या मदतीला कोल्हापुरातील कामगार धावून आले आहेत. आयटक संलग्न असलेल्या कामगारांनी वर्गणी काढून ५0 हजार ५00 रुपये निवडणूक निधी म्हणून पाठवून दिले आहेत.
बिहारमधील गरीब कुटुंबातील हा कन्हैया भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे बेगुसराय या मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवीत आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठीची अनामत रक्कमही नसल्याने देशभरातून जमा झालेल्या वर्गणीतूनच ती भरली गेली. कन्हैयाकुमारच्या मागे ताकद उभी करण्यासाठी कोल्हापुरातीलही कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांनी खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच आयटकच्या नेतृत्वाखालील गोकुळ दूध संघातील कर्मचारी, केडीसी बँक कर्मचारी संघटना, करवीर कामगार संघ, श्रमिक प्रतिष्ठान या सर्वांनी वर्गणी काढली.
 

Web Title: 50 thousand support from Kanhaiyakumar from Kolhapur workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.