CoronaVirus News : "केंद्र सरकार जेवढं डोकं विरोधी पक्षांच्या राज्यांविरोधात वापरतंय त्याच्या 1 टक्का यासाठी वापरलं असतं तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 08:46 AM2021-06-01T08:46:18+5:302021-06-01T09:03:51+5:30
AAP Manish Sisodia Slams Modi Government : उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी केंद्र सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. राजधानी दिल्लीतही कोरोना परिस्थिती गंभीर आहे. या कोरोना परिस्थितीवरून दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी (Adesh Gupta) पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधांचा हवाला देत-देत केजरीवाल सरकारने दिल्लीला कोरोनाचा मृत्यूदर प्रती 10 लाखांच्या यादीत आघाडीवर आणून ठेवला आहे. याशिवाय, अरविंद केजरीवाल यांनी कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या आकडेवारीमध्ये हेराफेरी केल्याचा आरोपही आदेश गुप्ता यांनी केला आहे. यानंतर आता उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी केंद्र सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.
मनिष सिसोदीया (AAP Manish Sisodia) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षात असणाऱ्या राज्यांविरोधात लढण्यासाठी शक्ती वापरण्याऐवजी केंद्राने तिचा वापर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात करावा असं सिसोदीया यांनी म्हटलं आहे. "केंद्र सरकार जेवढं डोकं विरोधी पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्य सरकारांशी लढण्यासाठी वापरत आहे त्याच्या एक टक्का जरी कोरोनाविरुद्धच्या लढाईत किंवा लसीकरणाची व्यवस्था बसवण्यासाठी वापरलं असतं तर आज देशात हाहाकार उडाला नसता. एवढ्या जणांचा मृत्यू झाला नसता. पण ते म्हणतात ना ज्याच्या मानसिकतेमध्ये जे असतं तेच तो करतो तसा प्रकार आहे" अशा शब्दांत सिसोदीया यांनी निशाणा साधला आहे.
केंद्र सरकार जितना दिमाग़ विपक्ष की राज्य सरकारों से लड़ने में लगाती है उसका एक प्रतिशत भी कोरोना से लड़ने में, वैक्सीन की व्यवस्था करने में लगाया होता तो आज देश में हाहाकार न मचा होता, इतनी मौतें न हुई होतीं.
— Manish Sisodia (@msisodia) June 1, 2021
पर कहते हैं ना- जिसकी मानसिकता में जो होता है वही बाँटता है.
केजरीवाल फेरफार करण्यामध्ये पारंगत आहेत, त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाही अरविंद केजरीवाल यांनी कोरोनामुळे मरण पावलेल्यांची खरी आकडेवारी लपवल्याचा आरोप आदेश गुप्ता यांनी केला आहे. याचबरोबर, ठरवा आणि निवडा या आधारावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मरण पावलेल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. मात्र दुसरीकडे शेकडो असे कोरोना योद्धे आहेत जे मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळण्याची वाट पाहत आहेत. तरी मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांची साधी दखलही घेतली नाही, असा आरोप आदेश गुप्ता यांनी केला आहे. एवढंच नाही तर दिल्लीमधील परिस्थिती चिंताजनक असताना अरविंद केजरीवाल यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. आरोग्य व्यवस्थेच्या कमतरतेमुळे दिल्लीत रुग्णांचा मृत्यू होत असतानाच दुसरीकडे केजरीवाल या परिस्थितीची जबाबदारी इतर कोणावर तरी ढकलण्याचा प्रयत्न करत होते. अन्य राज्यांच्या तुलनेत प्रती 10 लाख व्यक्तींच्या हिशोबाने दिल्लीमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेत, असे आदेश गुप्ता म्हणाले.
"जनतेच्या भल्यासाठी मी पंतप्रधानांचे पाय धरायलाही तयार पण असा माझा अपमान करू नका" #MamataBanerjee#WestBengal#NarendraModii#Politics#Indiahttps://t.co/wKV5UUij5f
— Lokmat (@MiLOKMAT) May 29, 2021
केजरीवाल सरकार कोरोना मृतांची आकडेवारी लपवतंय, भाजपाचा आरोप
दिल्लीत केजरीवाल सरकारने पहिल्या लाटेच्यावेळी सुद्धा आकडे लपवल्याचा खेळ खेळला होता, असा आरोपही आदेश गुप्ता यांनी केला. तसेच, दुसऱ्या लाटेच्या वेळीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मानवतेलाही लाजवेल अशी वागणूक दिल्लीकरांना देत मृतांचा खरा आकडा लपवल्याचा दावा आदेश गुप्ता यांनी केला आहे. दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार एका दिवसात दिल्लीत 450 हून अधिक जणांचा मृत्यू झालेला नाही. तर दुसरीकडे दिल्ली महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार एका दिवसात वेगवेगळ्या स्मशानभूमींवर एका दिवसात 700 हून अधिक जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, असे आदेश गुप्ता यांनी सांगितले.
CoronaVirus News : "केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी"; राहुल गांधींचा घणाघात#CoronavirusIndia#coronavirus#Congress#RahulGandhi#NarendraModi#Indiahttps://t.co/tk37MPgTtNpic.twitter.com/hDBOSX4HqH
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2021
आकडेवारी दर्शविते की 1 एप्रिल ते 17 मे दरम्यान दिल्लीतील तीन महानगरपालिकांमधील स्मशानभूमींमध्ये 16593 मृतदेहांवर अंत्यसंस्कार कोरोना विधीने करण्यात आले. केजरीवाल सरकारने या काळात केवळ 11061 मृत्यूची आकडेवारी जाहीर केली. केजरीवाल सरकारला मृतांची संख्या बदलून मृतांच्या कुटूंबाला नुकसान भरपाई देणे टाळायचे आहे का? केजरीवाल सरकारने मृतांची संख्या लपवून खोटे आरोप करण्याच्या लालसेने संवेदनशीलतेच्या कळसांवर विजय मिळविला ही बाब लाजिरवाणी आहे. या घृणास्पद कृत्याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांची माफी मागावी, असेही आदेश गुप्ता म्हणाले.
तक्रार करणाऱ्या चिमुकलीचा तुफान व्हायरल झालेला 'हा' क्यूट Video तुम्ही पाहिलात का? #education#children#NarendraModi#SocialMedia#ViralVideo#Videohttps://t.co/9x9ZyvNYbb
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2021