उत्तर प्रदेशातून प्रचंड शस्त्रसाठा हस्तगत, साडेतीन कोटींची दारू व रोख रक्कमही जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 05:50 AM2019-04-17T05:50:58+5:302019-04-17T05:51:09+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी बुलंदशहरमधून प्रचंड दारूसह, बेहिशेबी रोकड आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

Acquisition of huge weapons from Uttar Pradesh, liquor and cash worth Rs 3.5 crore of cash were also seized | उत्तर प्रदेशातून प्रचंड शस्त्रसाठा हस्तगत, साडेतीन कोटींची दारू व रोख रक्कमही जप्त

उत्तर प्रदेशातून प्रचंड शस्त्रसाठा हस्तगत, साडेतीन कोटींची दारू व रोख रक्कमही जप्त

Next

बुलंदशहर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी बुलंदशहरमधून प्रचंड दारूसह, बेहिशेबी रोकड आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. बुलंदशहर पोलिसांना नियमित तपासणीच्या वेळी तो सापडला.
यात दोन कोटी रुपये किमतीची दारू व दीड कोटी रुपयांची रोकड आहे. याखेरीज ४०५ अवैध शस्त्रे, ७३९ काडतुसेही पोलिसांनी ताब्यात घेतली. निवडणुकीच्या काळात हिंसाचार घडविण्यासाठी आणि मतदारांना आमिष दाखविण्यासाठी, तसेच प्रसंगी धमकावण्यासाठी या साऱ्यांचा वापर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुकीच्या काळात एवढी बेकायदा शस्त्रे प्रथमच सापडली आहेत.
या आधी पोलिसांनी व प्राप्तिकर विभागाने निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने रोख रक्कम, दारू, अमली पदार्थ, सोने, चांदी, दागिने, भेटवस्तू असा २,५0४ कोटी रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. त्यातील सर्वाधिक ऐवज गुजरातमधून जप्त करण्यात आला होता. मात्र, तामिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांतूनही रोख रक्कम, दारू जप्त करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Acquisition of huge weapons from Uttar Pradesh, liquor and cash worth Rs 3.5 crore of cash were also seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.