अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर उद्या 'या' ठिकाणावरुन दाखल करणार उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 03:14 PM2019-03-24T15:14:34+5:302019-03-24T15:42:57+5:30

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड प्रकाश आंबेडकर लाेकसभा निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Adv. Prakash Ambedkar will stand for loksabha election from solapur constituency | अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर उद्या 'या' ठिकाणावरुन दाखल करणार उमेदवारी अर्ज

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर उद्या 'या' ठिकाणावरुन दाखल करणार उमेदवारी अर्ज

Next

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर लाेकसभा निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. आंबेडकर कुठून निवडणूक लढणार याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता हाेती. अखेर आंबेडकर हे साेलापूर येथून लाेकसभेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे साेलापूरमध्ये आंबेडकर, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. 

भीमा काेरेगाव येथे दलितांवर झालेल्या हल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी कणखर भूमिका घेतली हाेती. त्यामुळे आंबेडकरी समाज त्यांच्या मागे उभा राहिला. आंबेडकरांनी त्यानंतर वंचित बहुजन आघाडीची स्थापन केली. त्यात एमआयएमलाही सामावून घेण्यात आले. आंबेडकरांनी राज्यभर विविध सभा घेतल्या. त्यांच्या सभांना माेठा प्रतिसाद मिळाला. आंबेडकरांनी काॅंग्रेससाेबत जाण्याची तयारी दर्शवली हाेती. परंतु जागा वाटपावरुन दाेन्ही पक्षांमध्ये एकमत न झाल्याने आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सर्वच जागांवर आपले उमेदवारी जाहीर केले.

दरम्यान आंबेडकर हे अकाेल्यातून लाेकसभा लढविणार की साेलापूरमधून याबाबत साशंकता हाेती. अखेर आंबेडकर हे साेलापूर मधून निवडणूक लढविणार आहेत. आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी देखील लाेकमतशी बाेलताना आंबेडकर हे साेलापूर मधून लढणार असल्याचे जाहीर केले हाेते. त्यामुळे साेलापूर मध्ये रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Adv. Prakash Ambedkar will stand for loksabha election from solapur constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.