Afghanistan Crisis : "ज्या लोकांना भारतात भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात निघून जावं, तिथे पेट्रोल पण स्वस्त आहे" 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 04:40 PM2021-08-18T16:40:28+5:302021-08-18T16:50:02+5:30

Afghanistan Crisis And BJP Haribhushan Thakur : भाजपाच्या एका आमदाराने एक वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला असून राजकारण तापलं आहे. 

Afghanistan Crisis bjp mla haribhushan thakur says people who scared in india should go to afghanistan | Afghanistan Crisis : "ज्या लोकांना भारतात भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात निघून जावं, तिथे पेट्रोल पण स्वस्त आहे" 

Afghanistan Crisis : "ज्या लोकांना भारतात भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात निघून जावं, तिथे पेट्रोल पण स्वस्त आहे" 

Next

नवी दिल्ली - अफगाणिस्तानात मोठा हिंसाचार सुरू आहे. तालिबाननेअफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केला. राजधानी काबुल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानींनी संसद, राष्ट्रपती भवनावर कब्जा केला. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. याच दरम्यान भारतातील काही राजकीय नेते तालिबानच्या कारवाईच्या समर्थनात धक्कादायक विधान करत आहेत. यामध्ये समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क (Shafiqur Rahman Barq) यांच्यासारख्या नेत्यांचाही समावेश आहे. यानंतर आता भाजपाच्या एका आमदाराने एक वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला असून राजकारण तापलं आहे. 

"ज्या लोकांना भारतात राहायची भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात निघून जावं, तिथे पेट्रोल पण स्वस्त आहे" असं आमदाराने म्हटलं आहे. हरिभूषण ठाकूर (BJP Haribhushan Thakur) असं या भाजपा आमदाराचं नाव असून त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. ठाकूर यांनी "अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र ज्या लोकांना येथे देशात राहायची भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात जावं, तिथे पेट्रोल देखील स्वस्त आहे" असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावरून अनेकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"अफगाणिस्तानमध्ये तालिबानची लढाई ही स्वातंत्र्यासाठी"'; सपा खासदाराचं वादग्रस्त विधान 

हरिभूषण ठाकूर यांच्या आधी "तालिबानची ही स्वातंत्र्यासाठी लढाई" असल्याचं वादग्रस्त विधान बर्क यांनी केलं आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची लढाई ही स्वातंत्र्यासाठी आहे असं म्हटलं आहे. "तालिबान अफगाण नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी लढाई लढत आहे. अफागाणिस्तानचे स्वातंत्र्य हा त्यांचा मुद्दा आहे. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे राज्य का आहे? तालिबान तिथली एक शक्ती आहे आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना त्यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य हवे आहे" असं देखील खासदारांनी म्हटलं आहे. समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान यांच्यानंतर आता ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनीही तालिबानचं समर्थन करणारं विधान केले आहे. 

तालिबानीच्या हिंमतीला सलाम करत सर्वात ताकदवान असलेल्या सैन्याला मात देण्याचं कौतुक मौलाना सज्जाद नोमानी यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी टीका केली आहे. मौलाना सज्जाद नोमानी म्हणाले की, पुन्हा एकदा ही तारीख इतिहासात नोंदवली जाईल. एका दुर्लक्षित गटानं सर्वात मोठ्या फौजेला मात दिली. काबुलच्या महालात ते दाखल झाले. काबुलमध्ये त्यांची उपस्थिती अख्ख्या जगानं पाहिली. त्यांच्यात ना कोणता अहंकार होता ना घमंड आहे. मोठी वार्ता नाही. ते नवयुवक काबुलच्या धरतीवर आले. त्यांचे अभिनंदन. तुमच्यापासून दूर असलेला हिंदी मुसलमान तुम्हाला सलाम करतो. तुमच्या धाडसाला सलाम करतो. तुमच्या कर्तृत्वाला सलाम करतो असं त्यांनी सांगितले. अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर तालिबानींनी कब्जा केल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. 

तालिबानचा क्रूर चेहरा! काबुल विमानतळावर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकावर गोळीबार; Video व्हायरल

विमानांत माणसं कोंबून स्थलांतर करत असल्याची भयंकर परिस्थिती अफगाणिस्तानात निर्माण झाली आहे. याच दरम्यान आता पुन्हा एकदा तालिबानचा क्रूर चेहरा समोर आला आहे. काबुल विमानतळावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकावर तालिबान्यांनी थेट गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. अश्वका न्यूजने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत एक नागरिक विमानतळाच्या भिंतीवर चढून विमानतळावर जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी खालून काळ्या कपड्यातील एक बंदुकधारी या नागरिकाच्या दिशेने गोळी झाडतो. यानंतर तो नागरिक गोळी लागल्याने भिंतीवरुन खाली पडतो.


 

Read in English

Web Title: Afghanistan Crisis bjp mla haribhushan thakur says people who scared in india should go to afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.