"पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतराच्या हालचाली सुरू होणार’’

By बाळकृष्ण परब | Published: November 23, 2020 11:17 AM2020-11-23T11:17:30+5:302020-11-23T11:21:20+5:30

Praveen Darekar News : ठाकरे सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच पुन्हा एकदा हे सरकार अस्थिर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

"After the graduate, teacher constituency elections, the movement to change the government in the state will begin." - Praveen Darekar | "पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतराच्या हालचाली सुरू होणार’’

"पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतराच्या हालचाली सुरू होणार’’

Next
ठळक मुद्देराज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारामुळे राज्यातील जनता त्रस्त झालेली आहेत्याचे पडसाद होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून येतील या निवडणुकीतील पाचही जागांवर भाजपाचा विजय होईल. तसेच तेथूनचा राज्यातील सत्तांतराच्या हालचालींना सुरुवात होईल

मुंबई - अनेक घडामोडींनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार या आठवड्यात एक वर्ष पूर्ण करणार आहे. मात्र ठाकरे सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच पुन्हा एकदा हे सरकार अस्थिर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात होत असलेल्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतराच्या हालचाही होतील, असे विधान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपानेतेप्रवीण दरेकर यांनी केले आहे.

राज्यातील सत्तांतराच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा देताना प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारामुळे राज्यातील जनता त्रस्त झालेली आहे. त्याचे पडसाद होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून येतील. या निवडणुकीतील पाचही जागांवर भाजपाचा विजय होईल. तसेच तेथूनचा राज्यातील सत्तांतराच्या हालचालींना सुरुवात होईल.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे भाजपा उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर हे जालना येथे आले होते. तेथे प्रचारसभा आटोपल्यानंतर दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी राज्यातील सरकार हे जातीपातीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण या सरकारला सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही, असा आरोप दरेकर यांनी केला.

तसेच कोरोनाच्या संकटकाळात राज्याची अर्थव्यवस्था नीट हाताळण्यात सरकारला अपयश आले आहे. सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय नाही, असा टोला भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

Web Title: "After the graduate, teacher constituency elections, the movement to change the government in the state will begin." - Praveen Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.