अहो आश्चर्यम्... देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांचा 'ठाकरे सरकार'ला एकसारखाच सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 07:04 PM2021-03-23T19:04:57+5:302021-03-23T19:06:13+5:30

after shiv sena mp sanjay raut bjp leader devendra fadnavis thinks thackeray government should introspect: रविवारी संजय राऊत यांनी सरकारला सल्ला दिल्यानंतर दोनच दिवसांनी फडणवीसांनी सरकारला सल्ला दिला आहे.

after shiv sena mp sanjay raut bjp leader devendra fadnavis thinks thackeray government should introspect | अहो आश्चर्यम्... देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांचा 'ठाकरे सरकार'ला एकसारखाच सल्ला

अहो आश्चर्यम्... देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांचा 'ठाकरे सरकार'ला एकसारखाच सल्ला

Next

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार (Mukesh Ambani Security Scare) आढळल्यापासून राज्याच्या राजकारणात स्फोटक घडामोडी घडत आहेत. स्फोटकांचा तपास करणारे पोलीस अधिकारी सचिन वाझेंना (Sachin Vaze) झालेली अटक, त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग (Param Bir Singh) यांची झालेली बदली, त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेले अतिशय गंभीर आरोप यांच्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं असताना विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षानं ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मी सरकारच्या चहाचा ओशाळा नाही! राऊतांचा सूर बदलला; राज्य सरकारला दिला 'मोलाचा' सल्ला

गृहमंत्री सचिन वाझेंना गृहमंत्री देशमुख यांनी १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे केला. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर असून देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणी भाजपनं केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थोड्याच वेळापूर्वी दिल्लीत गृह सचिवांची भेट घेतली. पोलीस खात्याच्या बदलांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे पुरावे सचिवांकडे सोपवल्याचं फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितलं. राज्य सरकारला आत्मचिंतनाची गरज असल्याचं ते म्हणाले.

सर्व पुरावे बंद लिफाफ्यात गृह सचिवांना दिलेत, आता योग्य ती कारवाई होईल: देवेंद्र फडणवीस

संजय राऊतांनीदेखील दिला होता आत्मचिंतनाचा सल्ला
राज्यातील सरकारला दीड वर्ष पूर्ण झालं आहे. सरकारमधील घटकांनी आत्मपरिक्षण करावं. आपले पाय जमिनीवर आहेत की नाही ते तपासून पाहावं, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोनच दिवसांपूर्वी सरकारला दिला होता. परमबीर सिंग यांच्या खळबळजनक पत्रावर बोलताना त्यांनी हा सल्ला दिला होता. या घटनेमुळे सरकारवर नक्कीच शिंतोडे उडाले आहेत. यासंदर्भात अनेकदा मी सामनामधून लिहित असतो. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असं सूचक विधान राऊत यांनी केलं होतं.

राऊतांनी ट्विट केलेल्या शायरीचा अर्थ काय..?
संजय राऊत यांनी रविवारी एक शायरी ट्विट केली होती. 'हमको तो तलाश बस नये रास्तों की है, हम है मुसाफिर ऐसे जो मंझिल से आए है...' असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. राऊत यांच्या ट्विटचा नेमका अर्थ काय, अशी चर्चा रंगू लागली. याबद्दल विचारलं असता, त्याचा अर्थ तुम्हाला लवकरच कळेल, असं सूचक उत्तर त्यांनी दिलं. 

Web Title: after shiv sena mp sanjay raut bjp leader devendra fadnavis thinks thackeray government should introspect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.