“RSS चे मोहन भागवत खरंच देशभक्त असतील, तर त्यांनी...”; ओवेसींचे खुले आव्हान!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 02:36 PM2021-08-17T14:36:19+5:302021-08-17T14:49:24+5:30
एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला असून, नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची टीका केली आहे.
हैदराबाद: आताच्या घडीला देशात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाची परिस्थिती, लसीकरण, इंधनदरवाढ, महागाई यांसह भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून सुरू असलेला संघर्ष याचाही समावेश आहे. देशाने आत्मनिर्भर व्हायला हवे. आपण जेवढं आत्मनिर्भर असू तेवढेच सुरक्षित असू, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले होते. यावर एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला असून, नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची टीका केली आहे. (aimim asaduddin owaisi criticized rss mohan bhagwat over indian economy and china border dispute)
“मी तेव्हाच सांगितलं होतं की भारताने तालिबानशी...”; ओवेसींचा मोदी सरकारवर निशाणा
नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. मोहन भागवत म्हणतात की आपण चीनवर अवलंबून राहायला नको. मग देशावर नोटाबंदी कोणी लादली, देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्यासाठी कोण जबाबदार आहे, असा सवाल करत याचे उत्तर केवळ मोदी सरकार आहे, या शब्दांत असदुद्दीन ओवेसी केंद्रातील मोदी सरकार आणि मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला.
तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार
मोहन भागवत खरंच खरे देशभक्त असतील, तर...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांची विचारसरणी RSS ची आहे, ते चीन विरोधात चकार काढायलाही घाबरतात. त्यामुळे जर भागवत हे खरे देशभक्त आहेत तर, त्यांनी सर्वांसमोर येऊन चीनी सैन्याने भारतात घुसखोरी हे मान्य करावे. कोरोना महामारीत मोदी सरकारने जनतेसाठी आणलेल्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झालेय. मोहन भागवत तुम्हाला देशातील जनतेची ही स्थिती बघवत आहे का, असा सवाल करत मोहन भागवत यांचे विधान बोगस आहे, असल्याचा घणाघात ओवेसी केला आहे. चीनी सैनिक भारतात घुसून बसले आहेत, ही वास्तविकता आहे आणि ती मोहन भागवतांना दिसत नाही. देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आहे. नोटाबंदीचे दुष्परीणाम देश अद्यापही भोगत असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?
दरम्यान, आपण इंटरनेटचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करतो. जे मूळ रूपाने भारतातून येच नाही. आपण कितीही चीनबाबत ओरडलो, तरी आपल्या फोनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या चीनमधूनच येतात. जोपर्यंत चीनवर अवलंबून राहणे कमी होणार नाही, तोवर चीनसमोर झुकावे लागेल. आत्मनिर्भर बनताना उत्पादनाच्या उत्कृष्टतेवर आपला भर असायला हवा. छोट्या-मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवे., असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.