‘नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही’; शरद पवारांच्या विधानावार पार्थ पवार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 05:52 PM2020-08-12T17:52:42+5:302020-08-12T17:53:28+5:30
मुंबई पोलिसांना मी गेल्या ५० वर्षापासून ओळखतो, त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे असं सांगत पवारांनी पार्थचं नाव न घेता फटकारलं होतं.
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर पार्थच्या या मागणीवर आजोबा शरद पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली. मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात पवारांनी प्रतिक्रिया दिली.
पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही. तो अजून इमॅच्युर आहे. सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची कोणतीही गरज नाही. मुंबई पोलिसांना मी गेल्या ५० वर्षापासून ओळखतो, त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे असं सांगत पवारांनी पार्थचं नाव न घेता फटकारलं होतं. त्यावर पार्थ पवार यांनी मला पवार साहेबांच्या वक्तव्यावर काहीच बोलायचं नाही. सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि शरद पवार यांच्या वक्तव्यावर विनाकारण मला कोणतंही वक्तव्य करायचं नाही असं ते म्हणाले.
सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या दुर्दैवीच, पण त्यावर एवढी चर्चा कशासाठी? – शरद पवार
सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या दुर्दैवीच, पण त्यावर एवढी चर्चा कशासाठी? ही मोठी समस्या आहे, असं मला वाटत नाही. एका शेतकऱ्यानं मला सांगितलं की जवळपास 20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याबाबत कोणीच बोलत नाही. गेली ५० वर्षे मी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना पाहतोय आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. अन्य लोकं काय टीका करतात यावर मला काहीच बोलायचे नाही. या प्रकरणाचा तपास CBIनं किंवा अन्य कुणी करावा असं कोणाला वाटत असेल तर त्यांना मी विरोध करणार नाही.
सुशांत सिंग राजपूतच्या आरोपावरुन शिवसेना संतप्त
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे राज्यातील सत्ताधारी शिवसेना चांगलीच संतापली आहे. या प्रकरणावरून भाजपाकडून शिवसेनेला धारेवर धरले जात आहे. त्यामुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुठल्याही एका प्रकरणावरून सरकार व्हायला सुरुवात झाली तर सर्वप्रथम केंद्रातील मोदी सरकार पडेल, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन कमळच काय कुठलेही ऑपरेशन यशस्वी होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने जून महिन्यात आत्महत्या केली होती. तेव्हापासून या आत्महत्येवरून उलटसुलट दावे केले जात आहेत. तसेच या वादात भाजपानेही उडी घेतल्याने आता या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलीस आणि बिहार पोलीसही आमने-सामने आले आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी वाय. बी चव्हाण सेंटरला जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील परिस्थिती आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
१९० गणपती स्पेशल ट्रेन्स रखडल्या; राज्य सरकारच्या हलगर्जीपणाचा कोकणवासीयांना फटका?
पार्थ पवार अपरिपक्व, मागणीला कवडीची किंमत देत नाही - शरद पवार
संयम सुटला! भाजपा समर्थकांना संतप्त लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारलं; खासदार थोडक्यात बचावले
महापालिकेला पोलिसांवर भरवसा नाय का?; पहिल्यांदाच बीएमसीच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर्स तैनात