"सरकारच्या आकडेवारीपेक्षा कोरोना मृतांची संख्या 43 पट जास्त"; अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 06:01 PM2021-06-22T18:01:36+5:302021-06-22T18:10:26+5:30
Akhilesh Yadav And Yogi Government : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. रुग्णांचा आकडा हा 2,99,77,861 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 42,640 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,167 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,89,302 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी योगी सरकारवर (Yogi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीत फेरफार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी आता केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सरकारच्या आकडेवारीपेक्षा कोरोना मृतांची संख्या 43 पट जास्त आहे असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे. तसेच योगी सरकार मृत्यूंचे आकडे नाही तर स्वत:चं तोंड लपवत आहे अशी बोचरी टीका ही अखिलेश यांनी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "माहितीच्या आधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, असे दिसून आले आहे की, 31 मार्च, 2021 पर्यंत 9 महिन्यांत उत्तर प्रदेशातील 24 जिल्ह्यांमध्ये मृतांची संख्या सरकारच्या आकडेवारीपेक्षा 43 पट जास्त आहे. त्यामुळे भाजपा सरकार मृत्यूची आकडेवारी नव्हे तर आपलं तोंड लपवत आहे" असं अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सूचना के अधिकार के तहत मिली जानकारी से ये भंडाफोड़ हुआ है कि 31 मार्च, 2021 तक के कोरोनाकाल में 9 महीनों में उप्र के 24 ज़िलों में मृत्यु का आँकड़ा सरकार द्वारा दिये गये आँकड़ों से 43 गुना तक अधिक है।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) June 22, 2021
भाजपा सरकार मृत्यु के आँकड़े नहीं दरअसल अपना मुँह छिपा रही है।#NoMoreBJP
"उत्तर प्रदेशातील मृतदेह गंगेच्या पाण्यासोबत पश्चिम बंगालमध्ये येतात, कोरोना संक्रमणाचा अधिक धोका"
देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये मृतदेह नदीत वाहत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (TMC Mamata Banerjee) यांनी योगी सरकारवर (Yogi Government) हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या नद्यांमधून मृतदेह पश्चिम बंगालमध्ये येत असल्याचं म्हटलं आहे. तसेच कोरोना रुग्णांचे मृतदेह असल्याने कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असल्याचं म्हटलं आहे. मृतदेहांमुळे नदीतील पाणी देखील प्रदूषित झालं आहे.
ममता बॅनर्जींचा योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल, म्हणाल्या...#MamataBanerjee#yogiadityanath#WestBengal#Politics#coronavirushttps://t.co/hUTvX4apLwpic.twitter.com/pkX8wg18WZ
— Lokmat (@MiLOKMAT) June 22, 2021
नदीचं पाणी दुषित होत असल्याने आम्ही मृतदेह नदीबाहेर काढून त्यावर अंत्यसंस्कार करत आहोत, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. "उत्तर प्रदेशमधून अनेक मृतदेह गंगा नदीच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये येत आहेत. यामुळे नदीचं पाणी प्रदूषित झालं आहे. मालदा जिल्ह्यामध्ये नदीत सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. यापैकी काहींवर राज्य सरकारने अंत्यस्कार केले आहेत" असं ममता यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नद्यांमध्ये अनेक मृतदेह तरंगताना दिसले होते. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये देखील येत असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
Corona Vaccine : कोरोना लसीबाबत नागरिकांच्या मनातील संकोच दूर करण्यासाठी अनोखं पाऊल #coronavirus#CoronavirusPandemic#CoronaVaccine#CoronaVaccinationhttps://t.co/GI4mU0IFtD
— Lokmat (@MiLOKMAT) June 22, 2021