UP Election: फेसबुकवर योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा अखिलेश यादव अधिक पॉप्युलर!; हे आकडे काय दर्शवतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 05:40 PM2021-06-22T17:40:25+5:302021-06-22T17:41:31+5:30
UP Election: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा अखिलेश यादव फेसबुकवर अधिक पॉप्युलर असल्याचे पाहायला मिळत आहे.
लखनऊ: आगामी काही महिन्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच जोरदार तयारीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. जितीन प्रसाद यांच्यानंतर आता भाजपमध्ये इन्कमिंग सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यातच आता एक नवीन गोष्ट समोर आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा अखिलेश यादव फेसबुकवर अधिक पॉप्युलर असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आले असून, भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे का, अशीही चर्चा रंगू लागल्या आहेत. (akhilesh yadav is more popular on facebook than cm yogi adityanath)
भाजपने लोकसभेच्या दोन्ही निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा प्रभावी वापर केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता अनेक पक्ष भाजपला रोखण्यासाठी त्याच सोशल मीडियाचा वापर करताना दिसत आहेत. भाजप समर्थक आणि विरोधक यांच्यात सोशल मीडियावर नेहमी कलगीतुरा रंगताना दिसतो.
“PM मोदींचे केवळ नावच पुरेसे, युपी निवडणुका भाजप नक्की जिंकेल”: एके शर्मा
अखिलेश यादव यांच्या पोस्टवर अधिक प्रतिक्रिया
गेल्या आठवड्यात अखिलेश यादव यांनी फेसबुकवर १६ पोस्ट शेअर केल्या होत्या. यावर सुमारे २.९ मिलियन युझर्सनी प्रतिक्रिया दिली. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याच कालावधीत १७ पोस्ट फेसबुकवर शेअर केल्या. यावर केवळ १.३ मिलियन युझर्सनी प्रतिक्रिया दिल्या. यावरून अखिलेश यादव यांच्या म्हणण्याला जनता अधिक प्रतिसाद देतेय, असे सांगितले जात आहे.
निवडणुकांवर होणार परिणाम?
पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी आतापासूनच भाजपसह अन्य पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियाचा वापर करत आपल्या योजना, घोषणा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सुरू करण्यात आले आहे. सरकारी कामकाज सोडल्यास अखिलेश यादव सोशल मीडियामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या वरचढ होताना पाहायला मिळत आहे. मात्र, या लोकप्रियतेचा फायदा निवडणुकांमध्ये किती होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, असे सांगितले जात आहे.
जम्मू-काश्मीरसंदर्भात केंद्राने पाकिस्तानशीही चर्चा केली पाहिजे: मेहबुबा मुफ्ती
दरम्यान, भाजपचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष एके शर्मा यांनी, २०१३-१४ मध्ये उत्तर प्रदेशवासीय पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जेवढे प्रेम करत होते, तितकेच आताही करतात. पंतप्रधान मोदींचे नाव आणि त्यांचे आशीर्वाद हेच आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी पुरेसे असतील. माझा ठाम विश्वास आहे की आपल्या आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावाही एके शर्मा यांनी केला आहे.