भाजपसोबत युतीच्या चर्चांवर राऊत म्हणाले, "भारत-पाक नाही, आमिर आणि किरण राव यांच्यासारखं आहे नातं"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 12:57 PM2021-07-05T12:57:23+5:302021-07-05T12:59:22+5:30

Sanjay Raut On BJP ShivSena : शिवसेना-भाजपची राऊत यांनी केली आमिर खान, किरण राव यांच्या नात्याशी तुलना. यापूर्वी फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या युतीच्या चर्चा.

On alliance talks with BJP sanjay Raut said our relation is not like india pakistan its like amir khan kiran rao | भाजपसोबत युतीच्या चर्चांवर राऊत म्हणाले, "भारत-पाक नाही, आमिर आणि किरण राव यांच्यासारखं आहे नातं"

भाजपसोबत युतीच्या चर्चांवर राऊत म्हणाले, "भारत-पाक नाही, आमिर आणि किरण राव यांच्यासारखं आहे नातं"

Next
ठळक मुद्देशिवसेना-भाजपची राऊत यांनी केली आमिर खान, किरण राव यांच्या नात्याशी तुलना. यापूर्वी फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या युतीच्या चर्चा.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येतील का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यादरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राऊत यांनी भाजपसोबत शिवसेनेच्या असलेल्या नात्याची तुलना अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या नात्याशी केली आहे. नुकतंच त्या दोघांनी विभक्त होण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजप हे काही शत्रू नाहीत असं वक्तव्य केलं होतं. 

"आम्ही भारत पाकिस्तान नाही. आमिर खान आणि किरण राव यांना पाहा, हे अशाप्रकारचं नातं आहे. आमचे (शिवसेना-भाजप) राजकीय मार्ग निरनिराळे आहेत, परंतु आमची मैत्री कायम राहिल," असं संजय राऊत म्हणाले.


यापूर्वी काय म्हणाले होते फडणवीस?
"शिवसेना आणि भाजप यांच्यात शत्रुत्व नाही. मात्र आमच्यात वैचारिक मतभेद नक्कीच आहेत. शिवसेनेनं निवडणूक आमच्यासोबत लढवली. मात्र निवडणुकीनंतर शिवसेनेनं आमचा हात सोडला आणि ज्यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली, त्यांच्याच हात धरला. शिवसेना आणि आमच्यामध्ये वैयक्तिक स्वरुपाचा वाद नाही. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत," असं फडणवीस यांनी म्हणाले होते.

शिवसेनेनं पुन्हा हात दिला, तर त्यांना सोबत घेणार का, असा सवाल फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर राजकारणात जर-तर असं काही नसतं, असं फडणवीस म्हणाले. राजकारणात जे जर-तर वर राहतात, ते केवळ स्वप्नच पाहतात, राजकारणात परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात, असं अतिशय सूचक विधान त्यांनी केलं होतं. 

Web Title: On alliance talks with BJP sanjay Raut said our relation is not like india pakistan its like amir khan kiran rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.