अमित शहांकडून तोंडभरुन कौतुक, आता नारायण राणेंची केंद्रात मंत्रीपदी वर्णी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 04:51 PM2021-02-07T16:51:36+5:302021-02-07T16:52:06+5:30

amit shah in sindhudurga : अमित शहा यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात केली नारायण राणे यांची तोंडभरुन स्तुती

amit shah praises narayan rane in his sindhudurga visit | अमित शहांकडून तोंडभरुन कौतुक, आता नारायण राणेंची केंद्रात मंत्रीपदी वर्णी? 

अमित शहांकडून तोंडभरुन कौतुक, आता नारायण राणेंची केंद्रात मंत्रीपदी वर्णी? 

Next

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गात नारायण राणे (narayan rane) यांच्या मेडिकल कॉलेजचं उदघाटन झालं. उदघाटन कार्यक्रमात अमित शहा यांनी नारायण राणे यांचं तोंडभरुन कौतुक केलं. याशिवाय, ग्रामपंचायत निवडणुकीतही राणे यांनी भाजपला रत्नागिरी-सिंधुदुर्गात चांगलं यश मिळवून दिलं आहे. यामुळे अमित शहा हे नारायण राणे यांच्यावर खूश झाले असून त्यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे. (amit shah praises narayan rane)

आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती; अमित शहांचा हल्लाबोल

नारायण राणे यांच्या 'लाइफटाइम' या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शहा यांनी नारायण राणे हे अतिशय मेहनती आणि अन्यायाचा प्रतिकार करणारे नेते असल्याचं म्हणत त्यांच्या कामांचं तोंडभरुन कौतुक केलं. 

नारायण राणेंवर भाजपमध्ये अन्याय होणार नाही
"नारायण राणे हे जिथं अन्याय होतो तिथं निडरपणे संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायाविरोधात लढू शकत नाही. तो जनतेसाठी देखील लढू शकत नाही. नारायण राणे हे अन्यायाचा प्रतिकार करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द वळणावळणाची राहीली आहे. पण राणे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होणार नाही याची मी ग्वाही देतो. राणेंसारख्या नेत्यांना कसं सांभाळायचं हे भाजपला चांगलं समजतं", असं अमित शहा म्हणाले. शहा यांनी या विधानातून राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाण्याचे संकेत दिल्याचं म्हटलं जात आहे. 

दरम्यान, सिंधुदुर्गात आयोजित कार्यक्रमात अमित शहा यांच्यासोबत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतर भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित होते. 
 

Web Title: amit shah praises narayan rane in his sindhudurga visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.