Anil Deshmukh: “खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”: भाजप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 03:36 PM2021-06-25T15:36:20+5:302021-06-25T15:37:39+5:30
Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कारवाई केल्यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली असून नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली असून, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ती ईडीची स्टाइल आहे, अशी टीका केली होती. आता भाजपकडून याप्रकरणी निशाणा साधण्यात आला असून, खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत, असा आरोप करण्यात आला आहे. (bjp atul bhatkhalkar tweet over ed raid on anil deshmukh places)
ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी तर, दुसऱ्या टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या कारवाईविरोधात टीका केली. पुण्यात माध्यमांशी बोलताना, भाजपकडून सत्तेचा एजन्सीचा गैरवापर केला जात आहे. एजन्सीचा गैरवापर ही त्यांची स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसत आहे. भाजपची सत्ता आल्यापासून शरद पवार यांनाही नोटीस आली होती, अनुभव सगळ्यांनी घेतला आहे, असे टीकास्त्र सुप्रिया सुळे यांनी सोडले. यानंतर आता भाजपनेही टीका केली असून, आमदार अतुल भातखळकर यांनी यांसदर्भात एक ट्विट केले आहे.
“मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांची CBI चौकशी करा”; भाजपची मागणी
खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत
आज ईडीची कारवाई ज्यांच्यावर झाली ते अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
आज ED ची कारवाई ज्यांच्यावर झाली ते @AnilDeshmukhNCP आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले @advanilparab ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 25, 2021
मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांची CBI चौकशी करा
मिलिंद नार्वेकरांना दापोली-मुरूड किनाऱ्यावर अनिल परब याच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य दुमजली बंगला बांधण्यास सुरूवात केली आहे. त्या जागेची किंमत आताच्या घडीला १० कोटी आहे. या कामाला बहुतेक पर्यारवणमंत्री आदित्य ठाकरे यांचा गाइडन्स आहे. अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांची सीबीआय चौकशी करावी. अनिल देशमुख छगन भुजबळांच्या मार्गावर जात आहेत. त्यामुळे अनिल देशमुख आता केव्हा जेलमध्ये जाणार याची उत्कंठता व प्रतीक्षा राज्यातील जनतेला आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. या पत्रकार परिषदेवेळी किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओही दाखवला. यामध्ये एका बंगल्याचे बांधकाम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.