"अनिल परब कडवट शिवसैनिक, ते बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाहीत", संजय राऊत यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 12:15 PM2021-04-08T12:15:40+5:302021-04-08T12:18:14+5:30

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आता एक पत्र लिहून त्यात शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

"Anil Parab is a Shiv Sainik, he will not take false oath of Balasaheb", Sanjay Raut's statement | "अनिल परब कडवट शिवसैनिक, ते बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाहीत", संजय राऊत यांचे विधान

"अनिल परब कडवट शिवसैनिक, ते बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाहीत", संजय राऊत यांचे विधान

Next

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्याचे प्रकरण आता रोज नवनवी वळणे घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील अटक आरोपी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी आता एक पत्र लिहून त्यात शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र अनिल परब यांनी बाळासाहेब आणि आपल्या मुलींची शपथ घेत हे आरोप फेटाळले आहेत. त्यानंतर आता अनिल परब (Anil Parab) यांच्या बचावासाठी शिवसेना नेते संजय राऊत हे पुढे आले आहेत. ("Anil Parab is a Shiv Sainik, he will not take false oath of Balasaheb", Sanjay Raut's statement)

कडवट आणि खरा शिवसैनिक दुसरे काहीही करेल, पण बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही. अनिल परब हे कडवट शिवसैनिक आहेत. ते बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाहीत, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांना राज्यात येण्यासाठी विरोधी पक्षांकडून लाल गालिचे अंथरले जात आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. 

महाराष्ट्रातील सरकारला कोंडीत पकडण्याचे डावपेच यशस्वी होणार नाही. राज्य सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही. विरोधकांनी कितीही अडथळे निर्माण केले तरी आम्ही ते अडथळे भेदून पुढे जाऊ, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.  दरम्यान, राज्यातील सरकारमधील मंत्र्यांचे चारित्र्यहनन करण्याचे कारस्थान आखले जात आहे. त्यासाठी तुरुंगात असलेल्या आरोपींकडून काही लिहून घेतले जात आहे. जेलमध्ये अजूनही काही लोक आहेत. तेदेखील पत्र लिहू शकतात, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. 

Web Title: "Anil Parab is a Shiv Sainik, he will not take false oath of Balasaheb", Sanjay Raut's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.