भाजपने स्वप्नातच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवावा; अनिल परब यांचा शेलारांना टोला
By मोरेश्वर येरम | Published: November 21, 2020 06:38 PM2020-11-21T18:38:52+5:302020-11-21T18:42:43+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ''कर्तृत्ववान मराठा स्त्रिया'' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आशिष शेलार यांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी असं मत व्यक्त केलं होतं.
मुंबई
मराठा महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, या भाजप नेते आशिष शेलार यांच्या विधानवर शिवसेनेने टीका केली आहे.
'आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवू नये. भाजपला सत्तेची स्वप्न पडत आहेत आणि त्याच स्वप्नात त्यांनी भाजपच्या महिला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवावा', असा टोला शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ''कर्तृत्ववान मराठा स्त्रिया'' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आशिष शेलार यांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी असं मत व्यक्त केलं होतं. शेलारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यानंतर परब यांनी आज शेलारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.