ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर? संजय राऊतांचा शरद पवारांना प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 09:16 AM2020-07-09T09:16:01+5:302020-07-09T09:18:57+5:30
तीन विचारांचे तीन पक्ष असले तरी पण सगळेजण एका विचाराने मुख्यमंत्र्यांच्या धोरणाच्या पाठीमागे आहेत असं शरद पवारांनी सांगितले.
मुंबई – राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखतीचा दुसरा टिझर संजय राऊतांनी ट्विटवरुन प्रसिद्ध केला आहे. यात ठाकरे सरकारचे तुम्ही रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्टर असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे यावर मुलाखतीत शरद पवार काय उत्तर देतात हे जाणण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
पण यात काही मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपाचा जो १०५ आकडा आहे त्यात शिवसेनेचं पण योगदान होतं, मला जे बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत, बाळासाहेबांची विचारधारा, कामाची पद्धत भाजपाच्या विचारधारेशी सुसंगत होती असं मला कधीच वाटलं नाही, तीन विचारांचे तीन पक्ष असले तरी पण सगळेजण एका विचाराने मुख्यमंत्र्यांच्या धोरणाच्या पाठीमागे आहेत असं शरद पवारांनी सांगितले.
ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर?
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 9, 2020
काय म्हणतात शरद पवार? pic.twitter.com/ot0Y8pdJ0X
शरद पवारांची ही मुलाखत ११ ते १३ तारखेदरम्यान प्रसिद्ध होणार असून एक शरद, सगळे गारद या टायटलने ही मुलाखत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. मात्र मुलाखतीबाबत उत्सुकता वाढवण्यासाठी त्यातील काही भाग टिझरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
दरम्यान, बुधवारी या मुलाखतीचा पहिला टिझर प्रसिद्ध झाला. त्यात महाराष्ट्रातील सत्ता बदल हा अपघात होता काय?' असा मथळा असलेला हा व्हिडिओ उत्कंठा वाढवणारा ठरला. शरद पवारांची मुलाखत ऐतिहासिक ठरेल. अशी मुलाखत होणे नाही, असा दावा राऊत यांनी केला आहे. 'शरद पवार यांची मुलाखत घेण्याचं आधीच ठरलं होतं. शरद पवार हे राज्यातील देशातील प्रमुख नेते आहेत. लोकांनी बघितलेले आणि मी पाहिलेले पवार वेगळे आहेत. त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले, बदनामीकारक विधानं केली गेली. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हा लोकांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण मी म्हटलं होतं की, शरद पवार सरकार स्थापन करतील. त्यांनी बसलेली खीळ तोडून सरकार स्थापन केलं,' असं राऊत यांनी म्हटलं होतं.
देशाचे नेते मा.शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होइल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल..@PawarSpeaks चीन पासून महाराष्ट्रातील घडामोडी पर्यंत जोरदार बोलले. pic.twitter.com/pTdCKucP0n
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 6, 2020
तर दुसरीकडे संजय राऊत यांच्या एक शरद सगळे गारद या वाक्यावरुन भाजपा आमदार नितेश राणेंनीही राऊतांना टोला लगावला होता. राऊत म्हणतात एक शरद सगळे गारद, मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण गारद का? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी उपस्थित केला तसेच आपल्याच मालकाला, वाह क्या बात असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
एक शरद, सगळे गारद... मग उद्धवजी पण गारद का?; संजय राऊतांना 'पॉवर'फुल टोला