“छत्रपतींना स्वकीयांकडून त्रास झाला, तसा मला झाला”; सेनेला रामराम केलेल्या नेत्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 04:20 PM2021-08-19T16:20:47+5:302021-08-19T16:22:03+5:30
पुणे जिल्ह्यातील एका शिवसेनेच्या नेत्याने पक्षाला जय महाराष्ट्र करत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबई: महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजप अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप करताना तसेच कुरघोडी करताना पाहायला मिळत आहे. राज्यात महापालिकांच्या निवडणुका जवळ येतील, तसे हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. पुणे जिल्ह्यातील एका शिवसेनेच्या नेत्याने पक्षाला जय महाराष्ट्र करत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना, मला परकियांनी पराजित केलं नाही. मला स्वकीयांनीच पराजित केलं, छत्रपतींना जसा स्वकीयांकडून त्रास झाला तसाच मलाही झाला, असा आरोप केला. (asha buchke alleged over shiv sena after joins bjp in mumbai)
जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची सध्या गरज नाही; WHO ने केले स्पष्ट
आशा बुचके यांनी मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यश चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपचा पुणे जिल्ह्यात शिवसेनेला हा जोरदार झटका मानला जात आहे. यावेळी आशा बुचके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेना पक्षाचा विश्वास विसरु शकत नाही. पण न्याय देत असताना ज्यावेळी माझ्यासारख्या महिलेची काहींच्या सांगण्याने पक्षातून हकालपट्टी होते. मात्र या संकटात कार्यकर्त्यांनी माझी पाठ सोडली नाही, असे सांगत बुचके यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनींना भारतात येण्याचे आमंत्रण द्यावे”: BJP खासदार
छत्रपतींना स्वकीयांकडून त्रास झाला, तसा मला झाला
शिवसेनेत असताना पंचायत समितीवर भगवा फडकवून जिल्हा परिषदेत पाच सदस्य नेत न्याय देण्याची भूमिका कायम ठेवली. पक्ष निष्ठता कधीही सोडली नाही. कार्यकर्त्यांच्या जोरावर ७ निवडणूका लढले. परंतु मला परकियांनी पराजित केले नाही. मला स्वकीयांनीच पराजित केले. छत्रपतींना स्वकीयांकडून त्रास झाला, तसाच मलाही झाला, असा आरोप आशा बुचके यांनी केला आहे.
TATA ग्रुपचा धमाका! ‘या’ कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; २७० कोटींचा बोनस घोषित
दरम्यान, शिवसेनेत असताना कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून काम केले. प्रत्येक निवडणूक माझी निवडणूक म्हणून काम केले. माझा सरपंच झाला पाहिजे, माझा सदस्य झाला पाहिजे, या भावनेतून काम केले. भाजपा माझा पिंड असल्यामुळे संघटना आणि संघटनात्मक काम हे रक्तातच होते. ते घेऊन कार्यकर्त्याला मोठे करत असताना तो सदस्य तरी व्हावा, यासाठी वर्षाचे बारा महिने कष्ट केले. जुन्नर नगरपरीषदेची निवडणूक काबीज केली. तसेच पंचायत समितीवर भगवा फडकवून जिल्हा परिषदेत पाच सदस्य नेत न्याय देण्याची भूमिका कायम ठेवली. विधानसभा निवडणूक गमावली तरी दुसऱ्या दिवशी सर्वांचे आभार मानले, हे फक्त कार्यकर्त्यांच्या जोरावर करता आले. ज्याच्या पाठीमागे कार्यकर्ता असतो तोच खरा नेता होऊ शकतो, असे त्या यावेळी म्हणाल्या.