“नितेश राणे यांच्याकडे जी प्रगल्भता आहे, ती दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही”; भाजपचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 07:30 PM2021-07-12T19:30:03+5:302021-07-12T19:31:00+5:30

भाजप नेते नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यापासून राज्यातही त्याबाबत मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.

ashish shelar criticised shiv sena about bjp leader nitesh rane | “नितेश राणे यांच्याकडे जी प्रगल्भता आहे, ती दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही”; भाजपचा टोला

“नितेश राणे यांच्याकडे जी प्रगल्भता आहे, ती दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही”; भाजपचा टोला

Next

सांगली: भाजप नेते नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यापासून राज्यातही त्याबाबत मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना आणि भाजप यांमध्ये या विषयावरून शाब्दिक चकमक, टोलेबाजी रंगल्याचे पाहायला मिळाले. नारायण राणे यांच्या सुपुत्रांनीही यानंतर विरोधकांचा समाचार घेतला. यानंतर आता नितेश राणे यांच्याकडे जी प्रगल्भता आहे, ती दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही, असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे. (ashish shelar criticised shiv sena about bjp leader nitesh rane)

भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात बोलताना, पक्षादेश दिल्यास कोणासोबतही काम करू, असे म्हटले होते. त्यावरुन आशिष शेलार यांनी नितेश राणे यांचे कौतुक केले आहे. यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडे जी प्रगल्भता आहे, ती दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. 

“कोरोना लस मोफत दिल्याबाबत PM मोदींच्या आभाराचे फलकही लावा”: सुजय विखे पाटील

नितेश राणे बोलले ही त्यांची प्रगल्भता

वेंगुर्ल्यातील एका कार्यक्रमावेळी भाजप आमदार नितेश राणे, रविंद्र चव्हाण, शिवसेना खासदार विनायक राऊत आणि माजी मंत्री दीपक केसरकर एकाच मंचावर आले होते. यावेळी बोलताना वरिष्ठांनी आदेश दिला, तर एकत्र काम करु, असे नितेश राणे म्हणाले. तर विनायक राऊत यांनी नितेश राणेंची पाठ थोपटली होती. यानंतर आता अचानक सूर कसे बदलले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. याबाबत पत्रकारांनी आशिष शेलार यांना विचारले असता, नितेश राणे बोलले ही त्यांनी प्रगल्भता असल्याचे ते म्हणाले. 

BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम

दरम्यान, पक्षाने आदेश दिला तर आम्ही कोणाबरोबरही काम करायला तयार आहे. वरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष (भाजप-शिवसेना) एकत्र मिळून काम करु, पक्षादेश महत्त्वाचा आहे, पक्षाने आदेश दिला तर आमच्यासारखे कार्यकर्ते एकत्र काम करतील, असे नितेश राणे यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांची पाठ थोपटली. यानंतर पुन्हा एकदा याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: ashish shelar criticised shiv sena about bjp leader nitesh rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.