"शिवसेनेला थपडेवर थप्पड...थपडेवर थप्पड", अतुल भातखळकरांचा थेट हल्ला
By मोरेश्वर येरम | Updated: December 17, 2020 16:59 IST2020-12-17T16:51:34+5:302020-12-17T16:59:03+5:30
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून १८ गावं वगळण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा निर्णय

"शिवसेनेला थपडेवर थप्पड...थपडेवर थप्पड", अतुल भातखळकरांचा थेट हल्ला
मुंबई
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून १८ गावं वगळण्याच्या राज्य सरकारच्या अधिसूचना मुंबई हायकोर्टाने बेकायदा ठरवून रद्द ठरवल्या आहेत. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर थेट हल्ला केला आहे.
"शिवसेनेला मोठा धक्का; 'ती' १८ गावं पालिकेतच. कल्याण-डोंबिवली महापालिकेतून १८ गावे वगळण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या दोन्ही अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बेकायदा ठरवून रद्दबातल केल्या..थपडेवर थप्पड...थपडेवर थप्पड...", असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
शिवसेनाला मोठा धक्का; 'ती' १८ गावे पालिकेतच
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 17, 2020
कल्याण-डोंबिवली महापालिकेतून (केडीएमसी) १८ गावे वगळण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या दोन्ही अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बेकायदा ठरवून रद्दबातल केल्या...
थपडेवर थप्पड... थपडेवर थप्पड... pic.twitter.com/jrQhLOa3A3
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून १८ गावं वगळण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं दिला आहे.