UP panchayat Election: अयोध्या, काशी, मथुरा! भाजपाचा दारूण पराभव; पंचायत निवडणुकीत सपा, बसपाने चारली धूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 09:46 AM2021-05-04T09:46:05+5:302021-05-04T09:46:54+5:30

Uttar Pradesh panchayat Election Result: अयोध्येपासून मथुरेपर्यंत आणि काशीसह राज्यभरात सपाने भाजपाला चितपट केले आहे. महत्वाचे म्हणजे हे तिन्ही जिल्हे योगी आदित्यनाथ सरकारच्या अजेंड्यामध्ये नेहमी असतात.

Ayodhya, Kashi, Mathura! BJP's drastic defeat in UP panchayat Election; SP, BSP won | UP panchayat Election: अयोध्या, काशी, मथुरा! भाजपाचा दारूण पराभव; पंचायत निवडणुकीत सपा, बसपाने चारली धूळ

UP panchayat Election: अयोध्या, काशी, मथुरा! भाजपाचा दारूण पराभव; पंचायत निवडणुकीत सपा, बसपाने चारली धूळ

googlenewsNext

UP Panchayat Election Results 2021: पश्चिम बंगालनंतर उत्तर प्रदेशच्या पंचायत निवडणुकांनी (Uttar Pradesh panchayat Election) भाजपाची (BJP Defeat) झोप उडविली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला मोठा झटका बसला आहे. अयोध्येपासून मथुरेपर्यंत आणि काशीसह राज्यभरात सपाने भाजपाला चितपट केले आहे. महत्वाचे म्हणजे हे तिन्ही जिल्हे योगी आदित्यनाथ सरकारच्या (Yogi Adityanath) अजेंड्यामध्ये नेहमी असतात. या तीन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून योगी सरकारने खूप मेहरबानीदेखील केली आहे. यामुळे या तिन्ही जिल्ह्यांत झालेली पडझड भाजपाला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठे संकेत देत आहे. ( Bjp's big Defet in UP Panchayat Election Ayodhya, Kashi, Mathura. Samajvadi party, BSP won.)


रामाची नगरी अयोध्येमध्ये भाजपाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अयोध्या जनपदमध्ये जिल्हा पंचायत सदस्यांच्या 40 जागा आहेत. यापैकी 24 जागांवर समाजवादी पक्षाने झेंडा फडकावला आहे. भाजपाला फक्त 6 जागा मिळाल्या आहेत. तर 12 अपक्षांच्या पारड्यात गेल्या आहेत. भाजपाला बंडखोरीमुळे मोठा पराभव पहावा लागला आहे. 13 जागांवर बंडखोरी झाली होती. राममंदीर बनत असताना अयोध्येत भाजपाला मोठा झटका बसला आहे. 


पंतप्रधानांच्या काशीमध्ये सपाचा डंका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात भाजपाची हालत चिंताजनक बनली आहे. एमएलसी निवडणुकीनंतर जिल्हा पंचायत निवडणुकीतही भाजपाला काशीमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा पंचायतीच्या 40 पैकी 8 जागा जिंकता आल्या आहेत. बसपाला पाच जागा मिळाल्या आहेत. बनारसमध्ये अपना दलाला 3 जागा, आपला 1 आणि सुहेलदेव यांच्या भारतीय समाज पार्टीला 1 जागा मिळाली आहे.तीन अपक्ष जिंकले आहेत. 2015 मध्ये देखील भाजपाला इथे मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, योगी सरकारने सत्तेत येताच जिल्हा पंचायतीची खूर्ची सपाकडून हिसकावली होती. 


श्रीकृष्णांच्या मथुरेतही पदरी निराशा
भगवान श्रीकृष्णांची नगरी समजल्या जाणाऱ्या मथुरेतही भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. मथुरेमध्ये बसपाने बाजी मारली आहे. बसपाने 12, आरएलडीने 9 जागंवर विजय मिळविला आहे. तर भाजपाला 8 जागा मिळाल्या आहेत. सपाला 1च जागा जिंकता आली आहे. 3 अपक्ष जिंकले आहेत. मथुरेत काँग्रेसच्या झोळीत भोपळा आला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्षच निवडणूकीत पडले आहेत. मथुरेत शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे भाजपाला पराभव पत्करावा लागल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: Ayodhya, Kashi, Mathura! BJP's drastic defeat in UP panchayat Election; SP, BSP won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.