"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 07:46 PM2024-11-08T19:46:57+5:302024-11-08T19:48:38+5:30

Narayan Rane on Uddhav Thackeray: शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारसभेत बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले. 

Balasaheb Thackeray would have shot Uddhav Thackeray; Statement of Narayan Rane | "...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान

"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान

Uddhav Thackeray Narayan Rane News: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पारा आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पण्यांमुळे चढू लागला आहे. काही राजकीय नेत्यांकडून वादग्रस्ते विधाने करण्यात आली आहेत. नारायण राणे यांनी केलेल्या एका विधानाची आता चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांनी बाळासाहेबांनी याला (उद्धव ठाकरे) गोळ्या घातल्या असत्या, असे विधान केले आहे.   

निलेश राणे यांच्या प्रचारार्थ कुडाळध्ये सभा झाली. या सभेत बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. 

नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंबद्दल विधान काय?

नारायण राणे म्हणाले, "शिवसेना या पक्षाचा हा (उद्धव ठाकरे) प्रमुख, बाळासाहेबांचा पुत्र एका सभेत म्हणतो... काय म्हणाला? अहो सोसायटीमध्ये तुम्हाला बकरी ईदला परवानगी द्यायची नसेल, तर दिवाळीचे कंदील उतरवा. मला बाळासाहेब आठवले. गोळ्या घातल्या असत्या याला (उद्धव ठाकरे) असं बोलल्यावर. खरं सांगतो, एवढे कडवट होते बाळासाहेब", असे विधान नारायण राणे यांनी केले.  

कुडाळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना

विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत होत आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघाचाही यात समावेश आहे. भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लढवत आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैभव नाईक हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

Web Title: Balasaheb Thackeray would have shot Uddhav Thackeray; Statement of Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.