'पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा द्या अन् तातडीने लसीकरण करा', बाळासाहेब थोरातांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 04:38 PM2021-05-04T16:38:30+5:302021-05-04T16:41:24+5:30

Balasaheb Thorat : सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी विनंती बाळासाहेब थोरात यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Balasaheb Thorat letter to CM Uddhav Thackeray on journalists vaccination  | 'पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा द्या अन् तातडीने लसीकरण करा', बाळासाहेब थोरातांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

'पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा द्या अन् तातडीने लसीकरण करा', बाळासाहेब थोरातांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

googlenewsNext
ठळक मुद्देममता बॅनर्जी यांनी राज्यातील सर्व पत्रकारांना कोविड योद्ध्याचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन टप्प्यात लसीकरण झाले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण होणार सुरू आहे. यातच महसूलमंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महत्वाची मागणी केली आहे. राज्यातील पत्रकार हे सातत्याने बातमीदारीच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी विनंती बाळासाहेब थोरात यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. (Balasaheb Thorat letter to CM Uddhav Thackeray on journalists vaccination)

बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटकाळात आपण अत्यंत संयमाने महाराष्ट्राची काळजी घेत आहात. अनेक लोकोपयोगी निर्णय आपण घेतले आहेत. आपल्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या हितासाठी कार्यरत आहे. एक विषय मात्र आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, पत्रकार हे सातत्याने बातमीदारी करण्याच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही धोका आहे. 

याचबरोबर, या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे असे माझे मत आहे. तामिळनाडू, मध्य प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यातील सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. तरी आपण या संदर्भाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी पत्राद्वारे केली आहे.

(CoronaVirus : कोरोना रुग्णांचा आकडा २ कोटी पार, जगात मृत्यूंच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर)

पश्चिम बंगालमधील पत्रकारांना कोविड योद्ध्याचा दर्जा
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सर्व पत्रकारांना कोविड योद्ध्याचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सरकारच्या अनेक योजना आणि सोयी सुविधांचा राज्यातील पत्रकारांना लाभ घेता येणार आहे. 

(कोरोनातून बरे झाल्यानंतर 'या' टेस्ट करणे महत्वाचे, दुर्लक्ष केल्यास अडचणी वाढू शकतील)

Read in English

Web Title: Balasaheb Thorat letter to CM Uddhav Thackeray on journalists vaccination 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.