"गेल्या 10 वर्षांपासून मी ममता दीदींसोबत", बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांचा TMCमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 03:13 PM2021-03-03T15:13:09+5:302021-03-03T15:23:27+5:30
TMC Syantika Banerjee And West Bengal Assembly Election 2021 : बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे.
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) सर्व राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर अनेक नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहे. यातच आता बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी (Syantika Banerjee) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. टीएमसीचे महासचिव पार्थ चॅटर्जी, मंत्री सुब्रत चॅटर्जी आणि ब्रात्य बसु यांच्या उपस्थितीत सायंतिका यांनी पक्षात प्रवेश केला आहे.
सायंतिका बॅनर्जी यांनी टीएमसीमध्ये प्रवेश करताच भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बंगालला केवळ ममता दीदी हव्या आहेत. "मला ही संधी दिल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे मनापासून आभार. मी आज अधिकृतरित्या TMC मध्ये प्रवेश केला. मात्र खरं सांगायचं झालं तर गेल्या 10 वर्षांपासून मी ममता दीदींसोबत आहे. हीच वेळ आहे मतदारांकडे आपलं भविष्य उज्वल करण्याची. बंगालला फक्त बंगालची मुलगी हवी आहे. बंगालला केवळ ममता बॅनर्जी हव्या आहेत" असं सायंतिका बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
Kolkata: Bengali actor Sayantika Banerjee joins Trinamool Congress, ahead of assembly elections in West Bengal pic.twitter.com/KfMSg193Ob
— ANI (@ANI) March 3, 2021
बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी (Bengali actor Srabanti Chatterjee) यांनी देखील राजकारणात उडी घेतली आहे. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री श्राबंती चटर्जींनी भाजपाप्रवेश केला. पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि पक्षाचे निवडणूक प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांचा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आता भाजपाकडून त्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार की त्या स्टार प्रचारक म्हणून काम करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, यंदाही पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात कलाकारांची एन्ट्री होताना दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी आतापर्यंत राजकारणात प्रवेश केला आहे.
...म्हणून नुसरत जहाँच्या भाजपा प्रवेशाची रंगलीय जोरदार चर्चा https://t.co/j0KGcl8Qbq#NusratJahan#TMC#BJP#WestBengalElections2021
— Lokmat (@MiLOKMAT) February 20, 2021
टीएमसीवर हल्लाबोल करताना भाजपाने बंगाल भाजपामधील नऊ महिला नेत्यांचे फोटो ट्वीटरवरुन शेअर केले आहेत. सोबतच बंगालला आपली मुलगी हवी आहे, आत्या नाही, अशा शब्दात ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) सणसणीत टोला लगावला आहे. भाजपाने आपल्या पोस्टरमध्ये ममता यांना आत्या म्हटलं आहे. बंगाल निवडणुकीच्या अभियानाच्या सुरुवातीलाच टीएमसीने बंगालला आपली मुलगी हवी असल्याची घोषणा दिली होती. टीएमसी दिल्लीतून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांना बाहेरचे असल्याचं म्हणलं आहे.
"बंगाल को अपनी बेटी चाहिए, बुआ नहीं", 'ते' पोस्टर ट्विट करत भाजपाचा ममता बॅनर्जींना सणसणीत टोला
तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी राज्यातील लोकांना आपली मुलगी पाहिजे, जी गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्याच्या रुपात त्यांच्यासोबत आहेत. आम्हाला बंगालमध्ये बाहेरच्या कोणाला आणायचं नाही असं म्हटलं होतं. भाजपाने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये भाजप नेत्या देबोश्री चौधरी, लॉकेट चटर्जी, रूपा गांगुली, भारती घोष आणि अग्निमित्रा पॉल यांच्यासह काही महिला नेत्यांचे फोटो शेअर केले आहेत. भाजपाने या महिला नेत्यांना बंगालची मुलगी म्हटलं आहे.
"बिहारचं सध्याचं सरकार चोर दरवाज्यातून आलं, जनता ही बाब खूप चांगली समजते", तेजस्वी यादवांचा हल्लाबोलhttps://t.co/2NosFsa1bH#WestBengalElection2021#TejashwiYadav#BJPpic.twitter.com/WkdvS1HU22
— Lokmat (@MiLOKMAT) March 2, 2021