सुमित्रा महाजन यांचा पत्ता होणार कट, दिग्गीराजांना 'हा' भाजपा नेता देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 03:42 PM2019-04-01T15:42:21+5:302019-04-01T15:50:40+5:30

मध्य प्रदेशमधल्या भोपाळ लोकसभा निवडणुकीच्या जागेवरून भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने येणार आहेत.

bhopal bjp plans to encroach on digvijay singh leaders, sumitra mahajan may cut | सुमित्रा महाजन यांचा पत्ता होणार कट, दिग्गीराजांना 'हा' भाजपा नेता देणार टक्कर

सुमित्रा महाजन यांचा पत्ता होणार कट, दिग्गीराजांना 'हा' भाजपा नेता देणार टक्कर

Next

भोपाळः मध्य प्रदेशमधल्या भोपाळ लोकसभा निवडणुकीच्या जागेवरून भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने येणार आहेत. इंदुरमधल्या विद्यमान खासदार आणि लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या जागी मालिनी गौड यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं भोपाळमधून दिग्विजय सिंह यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं असून, त्यांच्यासमोर भाजपाचे नरेंद्र सिंह तोमर असण्याची शक्यता आहे. परंतु कोणाला उमेदवारी द्यायची हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

विशेष म्हणजे भाजपा इंदुरच्या महापौर मालिनी गौड यांना उमेदवार बनवण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे भाजपानं दिग्विजय यांच्याविरोधात तोमर यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे. पण अद्यापही उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच कोणत्याही परिस्थितीत सुमित्रा महाजन यांना डावललं जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातं आहे. सुमित्रा महाजन या आठ वेळा इंदुरमधून खासदार राहिल्या आहेत. सुमित्रा महाजन यांचं वय 76 वर्षं आहे. भाजपानं यावेळी ज्यांचं वय वर्षं 75हून अधिक आहे, त्यांना उमेदवारी दिलेली नाही.

तर दुसरी त्यामुळे दिग्विजय सिंह यांचा कोणाशी मुकाबला होणार हे लवकरच समजणार आहे. दिग्विजय सिंह यांनीही जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपा आणि संघाच्या स्तरावर कोणाला उमेदवारी द्यायची यावर विचार सुरू आहे. भाजपानं अद्यापही उमेदवार दिलेला नसला तरी दिग्गीराजांना घेरण्यासाठी भाजपानं जोरदार रणनीती आखत असल्याचीही चर्चा आहे. 

Web Title: bhopal bjp plans to encroach on digvijay singh leaders, sumitra mahajan may cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.