Babul Supriyo: भाजपाला मोठा धक्का! माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला रामराम, खासदारकीही सोडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 05:49 PM2021-07-31T17:49:47+5:302021-07-31T17:51:21+5:30
BJP MP, former minister Babul Supriyo quits politics: लोकांच्या सेवेसाठी राजकारणात राहण्याची गरज नाही. राजकारणापासून वेगळे होऊनही ते हे करू शकतात. परंती मी पूर्वीपासून भाजपात होतो आणि भाजपातच असेन. माझा हा निर्णय त्यांना समेजल असे म्हणत बाबुल सुप्रियो यांनी या मागचे कारण गुलदस्त्यात ठेवले आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगालचे मोठे नाव असलेले भाजपाचे खासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी राजकारणाला रामराम करण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्यांनी मी राजकारणात केवळ समाज सेवेसाठी आलो होतो. आता मी माझा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हणत राजकारणाबरोबरच खासदारकीही सोडण्याची घोषणा केली आहे. (BJP MP, former minister Babul Supriyo quits politics announces on Social Media)
लोकांच्या सेवेसाठी राजकारणात राहण्याची गरज नाही. राजकारणापासून वेगळे होऊनही ते हे करू शकतात. परंती मी पूर्वीपासून भाजपात होतो आणि भाजपातच असेन. माझा हा निर्णय त्यांना समेजल असे म्हणत त्यांनी या मागचे कारण गुलदस्त्यात ठेवले आहे.
"I will leave my house (govt allotted residence) within one month. Resigning from my MP post too" posts BJP MP & ex-Union Minister Babul Supriyo.
— ANI (@ANI) July 31, 2021
गेल्या काही दिवसांपासून बाबुल सुप्रियो यांची भाजपामध्ये कमी होत चाललेली भूमिका बरेच काही सांगून जात होता. बाबुल काहीतरी मोठा निर्णय घेतील असे बोलले जात होते. यावर बाबुल सुप्रियो यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. पक्षासोबत माझे काही मतभेद होते. निवडणुकीच्या आधीच ते साऱ्यांसमोर आले होते. पराभवाची मी जबाबदारी घेतो, परंतू त्यासाठी बाकीचे नेते देखील जबाबदार आहेत, असे सुप्रियो म्हणाले.
पक्ष सोडण्याचा विचार बऱ्याच काळापासून
बाबुल यांनी म्हटले की, पक्ष सोडण्याचा विचार मी बऱ्याच काळापासून करत होतो. राजकारण सोडण्याचे आधीपासूनच मन बनविले होते. मात्र, जे पी नड्डा यांनी रोखल्यामुळे मी तो निर्णय मागे घेतला होता. आता काही नेत्यांबरोबर मतभेद वाढू लागले होते आणि वादही समोर येत होते, यामुळे मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बाबुल सुप्रियो यांनी सांगितले.