साताऱ्यातील राजकारणाला नवं वळण?; भाजपा आमदाराला राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ऑफर

By प्रविण मरगळे | Published: February 16, 2021 08:24 AM2021-02-16T08:24:21+5:302021-02-16T08:26:09+5:30

NCP Shashikant Shinde Offer BJP Shivendrasinghraje Bhosale: परंतु ज्या ठिकाणी विरोध होईल, तिथे ताकदीने निवडणूक लढली जाईल असा अप्रत्यक्ष इशाराही राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

Big offer of NCP Shashikant Shinde to BJP MLA Shivendrasinghraje Bhosale, Satara Political Updates | साताऱ्यातील राजकारणाला नवं वळण?; भाजपा आमदाराला राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ऑफर

साताऱ्यातील राजकारणाला नवं वळण?; भाजपा आमदाराला राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ऑफर

googlenewsNext
ठळक मुद्देशिवेंद्रसिंहराजेच काय माझा कुठल्याही नेत्याशी वैयक्तिक वाद नाही. पक्षाची ताकद टिकून ठेवायची असेल तर मला काम करावेच लागेल. पक्षवाढीसाठी आणि पक्षाला फायदा होण्यासाठी प्रयत्न करायला नकोत काय? त्याचा कोणाला त्रास होत असेल तर मी काय करू शकणार आहे.

सातारा – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे(NCP Shashikant Shinde) आणि भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले(BJP Shivendrasingh Bhosale) यांच्यातील वाद जिल्ह्यात गाजत होता. माझ्या वाटेला जाईल त्याची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थेट शशिकांत शिंदे यांना धमकीवजा इशारा दिला होता, त्यामुळे साताऱ्यातील राजकारण पेटलं होतं. (NCP Shashikant Shinde Offer to BJP MLA Shivendrasinghraje Bhosale before Nagar Palika Election in Satara)

अशातच राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना पक्षात येण्याची ऑफर दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शशिकांत शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले की, शिवेंद्रसिंहराजे भोसले नगरपालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत आले तर तेच पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनेलचे नेतृत्व करतील, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेत कधी पक्षीय राजकारण येऊ दिले नाही. रामराजे यांच्या माध्यमातून सगळेजण एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करतील असं त्यांनी सांगितले.

तसेच पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडण्यावर सुरुवातीपासूनच भर दिलेला आहे. जावळी, कोरेगाव हे दोन्ही तालुके माझ्यासाठी जवळचे आहेत. दोन्हीमधील माझे राजकारण सुरूच राहणार आहे. माझ्या विचारांचे लोक जर एकत्र येऊन पक्षासाठी काम करत असतील तर मला देखील पक्षवाढीसाठी आणि पक्षाला फायदा होण्यासाठी प्रयत्न करायला नकोत काय? त्याचा कोणाला त्रास होत असेल तर मी काय करू शकणार आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यावर आम्ही भर दिला आहे परंतु ज्या ठिकाणी विरोध होईल, तिथे ताकदीने निवडणूक लढली जाईल असा अप्रत्यक्ष इशाराही राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

शिवेंद्रसिंहराजेच काय माझा कुठल्याही नेत्याशी वैयक्तिक वाद नाही. पक्षाची ताकद टिकून ठेवायची असेल तर मला काम करावेच लागेल. कोणाला वाईट वाटते म्हणून पंचायत समिती, जिल्हा परिषद सोडायची का? काही दिवसांनी विधानपरिषद, डीपीडीसीची निवडणूक लागेल, राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या तरच या निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे. जिल्हा बँकेला जावळी सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढणार आहे – शशिकांत शिंदे, आमदार, राष्ट्रवादी

काय आहे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यातील वाद?

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीआधी साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात वाद निर्माण झाला होता. एका सभेत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 'सातारा तालुक्यातील संघर्ष टाळण्यासाठी आम्ही भाऊ एकत्र आलो, हे कोण काहीजणांना सोसत नाही, त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आहे. हीच मंडळी उदयनराजेंच्या आणि माझ्या कानाला लागून आमच्यात वाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र मी देखील भाऊसाहेब महाराजांचा मुलगा आहे, हे त्यांनी विसरू नये. ज्या उदयनराजेंना लोक घाबरतात, त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून मी निवडून आलेला आहे. मी कुणालाही घाबरत नाही. मी संपलो तरी चालेल पण माझ्या वाकड्यात शिरणाऱ्यांना मी संपवल्याशिवाय राहणार नाही असा गंभीर इशाराच शशिकांत शिंदे यांना नाव न घेता दिला होता.

त्यावर 'माझा आणि शिवेंद्रसिंहराजे यांचा कसलाही वाद नाही. तालुक्यातील कार्यकर्त्यांना मी भेटत असेल तर कोणाला त्रास होण्याची गरज नाही. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी केलेली असताना देखील मी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. माझ्या मनात जर खोट असती तर मी सातारा जावळी इथूनच लढलो असतो. आगामी काळामध्ये पक्षवाढीसाठी संघर्ष अटळ आहे. पक्षासासाठी मला संघर्ष करावाच लागणार आहे असं प्रत्युत्तर शशिकांत शिंदेंनी शिवेंद्रसिंहराजेंना दिलं होतं.

Web Title: Big offer of NCP Shashikant Shinde to BJP MLA Shivendrasinghraje Bhosale, Satara Political Updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.