Bihar Assembly Election 2020: शिवसेना बिहारमध्ये लढणार; पण 'ती' खास ओळख सोबत नसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 06:13 AM2020-10-06T06:13:35+5:302020-10-06T06:42:17+5:30

Bihar Assembly Election 2020: शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी सांगितले की, ५० जागा लढवाव्या अशी बिहारमधील कार्यकर्त्याची मागणी आहे. पण ३० ते ४० जागा लढवण्याचा आमचा विचार असून, दोन दिवसांत निर्णय होईल.

Bihar Assembly Election 2020 Shiv Sena May Contest 30-40 Seats says MP Sanjay Raut | Bihar Assembly Election 2020: शिवसेना बिहारमध्ये लढणार; पण 'ती' खास ओळख सोबत नसणार

Bihar Assembly Election 2020: शिवसेना बिहारमध्ये लढणार; पण 'ती' खास ओळख सोबत नसणार

Next

मुंबई : शिवसेनेने बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळणार नसल्याने निवडणूक आयोग ठरवेल त्या चिन्हावर त्यांना लढावे लागणार आहे.

शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी सांगितले की, ५० जागा लढवाव्या अशी बिहारमधील कार्यकर्त्याची मागणी आहे. पण ३० ते ४० जागा लढवण्याचा आमचा विचार असून, दोन दिवसांत निर्णय होईल.

बिहारमध्ये सत्तारुढ जदयुचे निवडणूक चिन्ह धनुष्य आहे. अन्य पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह दिले तर मतदारांचा गोंधळ होईल, असा आक्षेप जदयुने झारखंड मुक्ती मोर्चाबाबत घेतला होता. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा हा सत्तारुढ पक्ष असून त्याचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आहे. जदयुचा हा आक्षेप मान्य करीत आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह देण्यास मनाई केली. तोच आदेश शिवसेनेलाही लागू राहील.

सध्या नाही एकही जागा
बिहारमध्ये उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी खा.अनिल देसाई, खा.प्रियांका चतुर्वेदींवर आहे, असे सूत्रांनी सांगितले. २०१५ च्या निवडणुकीत सेनेने ८० जागा लढविल्या. एकही जागा जिंकली नव्हती. सेनेच्या सर्व उमेदवारांना मिळून २,११,१३१ मते मिळाली होती. पक्षाचे सात उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना १,८५,४३७ मते मिळाली होती.

Web Title: Bihar Assembly Election 2020 Shiv Sena May Contest 30-40 Seats says MP Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.