Bihar Assembly Election Results: जागा झिरो, पण भाजपसाठी हिरो; 'मोदींच्या हनुमाना'चा नितीश कुमारांना दे धक्का 

By कुणाल गवाणकर | Published: November 10, 2020 09:06 PM2020-11-10T21:06:34+5:302020-11-10T21:09:28+5:30

Bihar Assembly Election Results: भाजपच्या जागा वाढल्या; जेडीयूला मोठा धक्का

Bihar Assembly Election Results ljp suffers but dents nitish kumar's jdu benefits bjp | Bihar Assembly Election Results: जागा झिरो, पण भाजपसाठी हिरो; 'मोदींच्या हनुमाना'चा नितीश कुमारांना दे धक्का 

Bihar Assembly Election Results: जागा झिरो, पण भाजपसाठी हिरो; 'मोदींच्या हनुमाना'चा नितीश कुमारांना दे धक्का 

Next

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरू आहे. सध्याच्या घडीला एनडीएनं बहुमताचा आकडा ओलांडला आहे. एनडीए आणि महागठबंधन यांच्यात १४ जागांचं अंतर आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला भारतीय जनता पक्ष यंदा राज्यातला सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. पहिल्या स्थानासाठी भाजप आणि राष्ट्रीय जनता दलात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

आतापर्यंत बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचा लहान भाऊ असलेल्या भाजपनं यंदा मात्र जोरदार मुसंडी मारली. त्यात भाजपला लोकजनशक्ती पक्षाची मदत झाली. २०१५ मध्ये ७१ जागा जिंकणाऱ्या जेडीयूची यंदा पिछेहाट झाली आहे. सध्याच्या घडीला जेडीयू ४५ जागांवर पुढे आहे. तर भाजपनं ७३ जागांवर मुसंडी मारली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला ५३ जागा जिंकता आल्या होत्या. मात्र यंदा थेट ७० च्या पुढे जात भाजप राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरताना दिसत आहे.

भाजपच्या राजकारणानं मुख्यमंत्री नितीश कुमार घायाळ; मित्रपक्षावरच भाजपचा बाण?

भाजप, जेडीयू आणि लोकजनशक्ती पार्टी यांची बिहारमध्ये आघाडी होती. मात्र जागावाटपावरून लोजपानं राज्यात एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपण मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या जेडीयूच्या विरोधात आहोत. पण भाजपच्या विरोधात नाही, असं स्पष्ट भूमिका लोजपचे प्रमुख चिराग पासवान यांनी घेतली. एनडीएच्या बाहेर पडल्यावर त्यांनी जेडीयूच्या विरोधात दंड थोपटले. जेडीयूचे उमेदवार असलेल्या सगळ्याच जागांवर त्यांनी उमेदवार दिले. त्याचा फटका जेडीयूला बसताना दिसत आहे. विशेष म्हणजे लोजप अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्वत:ला 'मोदींचा हनुमान' म्हटलं होतं.

अमित शहांचा नितीश कुमारांना फोन; दिल्लीचे दूत मुख्यमंत्री निवासस्थानी हजर

चिराग यांचा लोजप संध्याकाळच्या सुमारास ४-५ जागांवर आघाडीवर होता. मात्र सध्याच्या घडीला लोजपचा एकही उमेदवार पुढे नाही. त्यामुळे लोजप भोपळा फोडण्याची शक्यता कमी आहे. मात्र नितीश कुमार यांना थेट टक्कर देऊन स्वत: झिरोवर आलेला लोजप भाजपसाठी हिरो ठरला आहे. जेडीयूशी दोन हात करताना लोजपचं नुकसान झालं आहे. मात्र त्यांनीही जेडीयूचं मोठं नुकसान केलं आहे. १५ वर्षांतील ही जेडीयूची सर्वात वाईट कामगिरी आहे.

मोदींचे हनुमान जेडीयूवर भारी
बिहार विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी जेडीयूविरोधात शड्डू ठोकत भाजपसाठी सोयीस्कर ठरणारी भूमिका घेतली. आपण मोदींचे हनुमान अशी स्वत:ची ओळख ते सांगत होते. त्याचा फायदा पासवान यांना फारसा होताना दिसत नाही. मात्र जेडीयूचं नुकसान करण्यात त्यांना यश मिळाल्याचं दिसत आहे. 

Web Title: Bihar Assembly Election Results ljp suffers but dents nitish kumar's jdu benefits bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.