Bihar Assembly Election Results: बिहारमधील भाजपचं यश म्हणजे फडणवीसांचा विजय? शरद पवारांचा मिश्किल टोला; म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Published: November 10, 2020 06:35 PM2020-11-10T18:35:22+5:302020-11-10T18:36:20+5:30

Bihar Assembly Election Results: बिहारच्या निवडणूक निकालावर बोलताना शरद पवारांचा चिमटा

Bihar Assembly Election Results ncp chief sharad pawars reaction on bjp and devendra fadnavis | Bihar Assembly Election Results: बिहारमधील भाजपचं यश म्हणजे फडणवीसांचा विजय? शरद पवारांचा मिश्किल टोला; म्हणाले...

Bihar Assembly Election Results: बिहारमधील भाजपचं यश म्हणजे फडणवीसांचा विजय? शरद पवारांचा मिश्किल टोला; म्हणाले...

Next

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाला बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचं महागठबंधन सत्ताधारी एनडीएला कडवी टक्कर देत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला मागे पडलेल्या भाजपनं नंतर जोरदार मुसंडी मारली. गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला भाजप यंदा थेट पहिल्या क्रमांकासाठी राजदशी स्पर्धा करताना दिसत आहे. याचं श्रेय भाजप नेते प्रसाद लाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक टोला लगावला आहे.

'देवेंद्र फडणवीसांनी नक्कीच इथं बसून बिहारची सुत्रं हलवली असतील'

बिहारमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारली आहे. गेल्या निवडणुकीत ५३ जागा जिंकणारा भाजप सध्या ७२ जागांवर पुढे आहे. विशेष म्हणजे भाजपनं घेतलेल्या भरारीमुळे जेडीयू मागे गेला आहे. त्यामुळे भाजप आघाडीमधील मोठा भाऊ ठरला आहे. बिहारमधील निवडणुकीचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे भाजपचं यश म्हणजे फडणवीसांचा विजय असल्याचं भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले.

बिहारमध्ये अपेक्षित निकाल लागला नाही, शरद पवारांनी सांगितलं कारण

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बिहारमधील भाजपच्या कामगिरीतील फडणवीस यांच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'हा चमत्कार आमच्या डोक्यात प्रकाश पाडणारा होता; फार चांगली माहिती सांगितली तुम्ही,' अशी खोचक प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. यावेळी त्यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं. तेजस्वी यांनी अतिशय चांगली लढत दिली. त्यांनी भाजप, जदयू विरोधात चांगली कामगिरी केली, अशी स्तुतीसुमनं पवार यांनी उधळली. 

बिहारमध्येही ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ होऊ शकतं; शिवसेना मंत्र्याचा मोठा दावा

काय म्हणाले होते प्रसाद लाड?
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएचा धुव्वा उडाल्याचं चित्र एक्झिट पोलमध्ये दाखवलं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात वातावरण असल्याचं दाखवलं. मात्र, बिहारमधील जनतेने भाजपवर, पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला” अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी एका मराठी वृत्त वहिनीला दिलेली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी उचलली. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचंही हे यश आणि विजय आहे. या निवडणुकीत एनडीए १३० च्या वर जाईल आणि महागठबंधन १०० च्या खाली येईल, असा विश्वासही यावेळी प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

Web Title: Bihar Assembly Election Results ncp chief sharad pawars reaction on bjp and devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.