Bihar Assembly Election Results: ...म्हणून नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत; संजय राऊतांनी सांगितलं राजकारण

By कुणाल गवाणकर | Published: November 10, 2020 04:08 PM2020-11-10T16:08:25+5:302020-11-10T16:09:12+5:30

Bihar Assembly Election Results: संजय राऊत यांच्याकडून तेजस्वी यादवांचं तोंडभरुन कौतुक

Bihar Assembly Election Results nitish kumar should thanks shiv sena says mp sanjay raut | Bihar Assembly Election Results: ...म्हणून नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत; संजय राऊतांनी सांगितलं राजकारण

Bihar Assembly Election Results: ...म्हणून नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत; संजय राऊतांनी सांगितलं राजकारण

googlenewsNext

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. सध्या भारतीय जनता पक्ष राज्यातला क्रमांक एकचा पक्ष होण्याकडे वाटचाल करत आहे. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) मोठा फटका बसला आहे. जेडीयूला सध्या ५० पेक्षा कमी जागांवर आघाडी आहे. गेल्या निवडणुकीत जेडीयूनं ७१ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा त्यांना मोठं नुकसान होताना दिसत आहे. भाजपनं जास्त जागा जिंकल्यानं मुख्यमंत्रिपद कोणाला याचीही चर्चा जोर धरू लागली आहे. 

बिहार निवडणुकीत शिवसेनेची तुतारी वाजलीच नाही; सर्व २२ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान

भाजपला जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळाल्या तरीही मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार, असं भाजप नेत्यांनी वारंवार स्पष्ट केलं. बिहारचा विनाअडथळा विकास व्हावा यासाठी नितीश यांचं सरकार आणा, असं आवाहन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारी जनतेला केलं. आताही भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल यांनी तशीच भूमिका मांडली आहे. यावर शिवसेनेने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 

मोदींच्या 'हनुमाना'चा मित्रपक्षाला फटका; भाजपमुळे जेडीयूला अर्धा डझनचा झटका?

शब्द पाळला नाही, तर काय होतं याचा अनुभव भाजपनं महाराष्ट्रात घेतलेला आहे. त्यामुळेच आता बिहारमध्ये भाजपनं सावध भूमिका घेतल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. 'भाजपनं शिवसेनेलाही मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. जागा कमी जास्त आल्या तरीही मुख्यमंत्रिपद देऊ असं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं. मात्र ते आश्वासन पाळलं गेलं नाही. त्यामुळे शिवसेनेनं पलटवार केला. त्यामुळेच आता भाजप आपल्या मित्रपक्षांना दिलेला शब्द पाळत आहे. पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानायला हवेत,' असं राऊत म्हणाले.

भाजपच्या राजकारणानं मुख्यमंत्री नितीश कुमार घायाळ; मित्रपक्षावरच भाजपचा बाण?

सध्याच्या कलांमध्ये बिहारमध्ये एनडीए पुढे असली तरीही आपण निकालांची वाट पाहायला हवी, असं राऊत यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी राजदचे नेते आणि महागठबंधनचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचं तोंडभरून कौतुक केलं. तेजस्वी यादवांच्या रुपानं बिहारला एक नवा चेहरा मिळाला आहे. तेजस्वी यादव यांनी एनडीएला दिलेली लढत पाहता तेच मॅन ऑफ द मॅच आहेत. ३० वर्षांचे तेजस्वी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमारांविरोधात एकटे लढले, अशी स्तुतीसुमनं राऊत यांनी उधळली.

Web Title: Bihar Assembly Election Results nitish kumar should thanks shiv sena says mp sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.