Bihar Election 2020 : बिहारमध्ये जागावाटप निश्चित; जेडीयू 122, तर भाजपा 121 जागांवर लढणार निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 07:52 PM2020-10-05T19:52:55+5:302020-10-05T19:53:18+5:30
भाजपा उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी सोमवारी उमेदवारांच्या निवडीसंदर्भात बैठक झाली. भाजपाचे वरिष्ठ नेते आज पाटणा येथे जात आहे. या दोन्ही पक्षांच्या जागांची सविस्तर घोषणा उद्या पाटणा येथे होईल. (Bihar Election 2020, jdu, bjp)
पाटणा :बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Assembly Election) भाजपा आणि जनता दल यूनायटेड (JDU) यांची युती निश्चित झाली आहे. जेडीयू 122 तर भाजपा 121 जागांवर ही निवडणूक लढेल. जेडीयू आपल्या जागांतील काही जागा जीतनराम मांझी यांना देणार आहे. तर भाजपा आपल्या जागांतील काही जागा व्हीआयपी पार्टीला देईल. उद्या पाटणा येथे युती, जागा आणि उमेदवारांची घोषणा होईल. मांझी यांना पाच ते सात जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजपा उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी सोमवारी उमेदवारांच्या निवडीसंदर्भात बैठक झाली. भाजपाचे वरिष्ठ नेते आज पाटणा येथे जात आहे. या दोन्ही पक्षांच्या जागांची सविस्तर घोषणा उद्या पाटणा येथे होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू आपल्या वाट्याला आलेल्या जागांमधून जीतनराम मांझी यांना, तर भाजपा आपल्या वाट्याला आलेल्या जागांमधून मुकेश साहनी यांच्या व्हीआयपी पार्टीला (VIP Party) जागा देतील. बीजेपी नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू आणि भाजपाची युती बळकट आहे. तसेच संपूर्ण शक्तीनूशी निवडणूक लढवली जाईल. भाजपाचे आजी मंत्री, आमदार अथवा त्यांच्या मुलांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे.
"बिहारमध्ये NDA 220 जागा जिंकणार" -
गेल्या आठवड्यातच, बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए 220 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवेल, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी केला आहे. एनडीए बिहारमधील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे आणि या निवडणुकीत एनडीएला 220 जागा मिळतील, असे शाहनवाझ हुसेन यांनी म्हटले आहे.
बिहारच्या जनतेचा नितीश कुमार आणि एनडीएवर विश्वास -
बिहार विधानसभेसाठी आता निवडणुकीची घोषणा झालेली आहे. बिहारच्या जनतेचा नितीश कुमार आणि एनडीएवर विश्वास आहे. कोरोनाकाळात राज्य आणि केंद्र सरकारने जे काम केले आहे, ते लोकांना दिसत आहे, असेही शाहनवा हुसेन यांनी म्हटले आहे.
शाहनवाझ हुसेन यांनी सांगितले की आम्ही गेल्या १५ वर्षांत जे काम केले आहे. त्या आधारावर मत मागत आहोत. आम्ही पाटण्यात एम्स बांधले. चार लाख शिक्षकांची नियुक्ती केली. नर्सिंग कॉलेज सुरू केले. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.