UP Election: “PM मोदींचे केवळ नावच पुरेसे, युपी निवडणुका भाजप नक्की जिंकेल”: एके शर्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 03:50 PM2021-06-22T15:50:48+5:302021-06-22T15:53:26+5:30
UP Election: उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच जोरदार तयारीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली: आगामी काही महिन्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच जोरदार तयारीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींचे जवळचे सहकारी मानल्या गेलेल्या एके शर्मा यांना उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष करण्यात आले आहे. यातच नव्या उपाध्यक्षांनी, PM मोदींचे केवळ नावच पुरेसे आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुका भाजप नक्की जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. (bjp ak sharma says pm narendra modi name is enough to bjp win next up election)
२०१३-१४ मध्ये उत्तर प्रदेशवासीय पंतप्रधाननरेंद्र मोदींवर जेवढे प्रेम करत होते, तितकेच आताही करतात. पंतप्रधान मोदींचे नाव आणि त्यांचे आशीर्वाद हेच आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी पुरेसे असतील, असे एके शर्मा यांनी यावेळी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेचे नेते आहेत. आमच्याकडे पक्षाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद आहेत, असेही शर्मा यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरसंदर्भात केंद्राने पाकिस्तानशीही चर्चा केली पाहिजे: मेहबुबा मुफ्ती
सर्वतोपरी विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करेन
उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर माजी आयएएस अधिकारी एके शर्मा यांनी उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना हे पत्र लिहिले आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वतोपरी विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करेन. या व्यतिरिक्त मी माझ्या सहकाऱ्यांनाही यासाठी प्रेरणा देईन. माझा ठाम विश्वास आहे की आपल्या आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावाही एके शर्मा यांनी केला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर २० वर्षे काम करण्याचा अनुभव आहे. या कालावधीत विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहाय्यक म्हणून काम केले. गुजरातचे मुख्यमंत्री होण्यापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात त्यांच्याबरोबर होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या यशस्वी प्रवासाचा मीही एक छोटासा भाग आहे, असे एके शर्मा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.