"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड?, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला", शेलारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 01:11 PM2020-09-19T13:11:24+5:302020-09-19T13:35:28+5:30
क्विन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय? असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ट्विटरवरून त्यांनी हल्लाबोल केला आहे.
मुंबई - भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ट्विटरवरून जोरदार टीका केली आहे. 'आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप?, झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड?, आता क्विन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत, क्विन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय? असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ट्विटरवरून त्यांनी हल्लाबोल केला आहे.
आशिष शेलार यांनी शनिवारी (19 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केलं आहे. "केंद्र सरकारच्या पुढाकाराने पर्यावरण पुरक एलईडी दिवे मुंबईत लावले गेले तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्विन नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला. अखेर झाले काय? तर शोभा वाढलीच! पण.. आता क्विन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत, क्विन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय?" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या पुढाकाराने पर्यावरण पुरक एलईडी दिवे मुंबईत लावले गेले तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्विन नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 19, 2020
अखेर झाले काय? तर शोभा वाढलीच!
पण..
आता क्विन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत, क्विन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय?
1/2
"आता पारसी गेट तोडलाच...समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार...परिसराची शोभा घालवणार. आता हे तुम्ही करताय ते पुण्य?, आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप?, झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड?, मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या "ढोंगीपणाचा गाळ" दिसला ना!" असं ट्विट शेलार यांनी केलं आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता.
आता पारसी गेट तोडलाच...समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार...परिसराची शोभा घालवणार.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 19, 2020
आता हे तुम्ही करताय ते पुण्य?
आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप?
झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड?
मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या "ढोंगीपणाचा गाळ" दिसला ना!
2/2
"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"
"मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा. सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवली आहे काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?" असं शेलार यांनी म्हटलं होतं. "मुंबई बाँम्बस्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा आणि देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा. वा रे वा! विवेकबुध्दी गहाण ठेवली काय?, हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?" असं शेलार यांनी म्हटलं होतं.
आशिष शेलारांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोलhttps://t.co/DQHDQc1qXS#MadanSharma#MaharashtraGovt#BJP#AshishShelarpic.twitter.com/oicjzWhKrn
— Lokmat (@MiLOKMAT) September 15, 2020
महत्त्वाच्या बातम्या
बलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय
मोठी कारवाई! अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट
कुत्र्यावरून दोन गटात तुफान 'राडा', अनेकजण जखमी; गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात