"...तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?"; भाजपाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 04:29 PM2021-04-13T16:29:56+5:302021-04-13T16:41:38+5:30

BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Maharashtra Lockdown : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.

BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Maharashtra Lockdown | "...तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?"; भाजपाचा हल्लाबोल

"...तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?"; भाजपाचा हल्लाबोल

Next

मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णसंख्येने एक कोटीचा टप्पा पार केला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढत असून रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. एकीकडे राज्यात लॉकडाऊनला पर्याय नसल्याचे सांगितले जात असून, याबाबत कधीही निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या भीतीमुळे परप्रांतीय कामगारांनी पुन्हा एकदा आपल्या गावाकडे धाव घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक प्रमुख शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर मजुरांची मोठी गर्दी आहे. यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

भाजपचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) सणसणीत टोला लगावला आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जन सहभागातून लॉकडाऊन घोषित केला. त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलं. मजूर तेव्हा स्थलांतरित होताना केंद्र सरकारने रस्तोरस्ती, घरोघरी मदत पोहचवली, धान्य, निवारा दिला. आज मजुरांना ना पाणी, ना धान्य ना कुठली मदत.... रेल्वे स्टेशनवर केवळ लाठ्याकाठ्यांचा मार. तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत. मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?" असं म्हणत शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

"लॉकडाऊनला विरोध ही करीत नाही, कारण जनतेचा जीव महत्वाचा"

"एक वर्षापूर्वी जेव्हा कोरोना विषाणूचा कोणताही इतिहास, भूगोल माहीत नव्हता... आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नव्हती, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जन सहभागातून लॉकडाऊन घोषित केला. त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आज एक वर्षानंतर कोरोनाचे उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असे बरेच काही उपलब्ध आहे. तेव्हा महाराष्ट्रातील तेच “हुशार” सत्ताधारी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे सांगतात. आम्ही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत नाही, किंवा लॉकडाऊनला विरोध ही करीत नाही, कारण जनतेचा जीव महत्वाचा" अशा शब्दात आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 

"आज मजुरांना ना पाणी, ना धान्य ना कुठली मदत... रेल्वे स्टेशनवर केवळ लाठ्याकाठ्यांचा मार..."

"मजूर तेव्हा स्थलांतरित होताना केंद्र सरकारने रस्तोरस्ती, घरोघरी मदत पोहचवली, धान्य, निवारा दिला! आज मजुरांना ना पाणी, ना धान्य ना कुठली मदत... रेल्वे स्टेशनवर केवळ लाठ्याकाठ्यांचा मार. तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत. मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?" असा खोचक सवालही आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांशी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. कोरोना नियंत्रण किंवा उपाययोजनांसाठी प्रशासकीय यंत्रणा कमी पडल्याचा ठपकाही केंद्रीय पथकाने ठेवला आहे. दुसरीकडे राज्यात कोरोना लस, रेमडिसिव्हीर इंजेक्शन आणि इतर आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. 

"गोरगरिबांसाठी मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं", भाजपाचा सणसणीत टोला

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रातील एकंदरीत कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असून आता त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी जनतेत भीतीचं वातावरण निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हर्षवर्धन यांनी देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याचे सांगितले. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत असल्याचे हर्षवर्धन यांनी यावेळी स्पष्ट केले. हर्षवर्धन यांनी देशात परिस्थिती नियंत्रणात असून, अनेक त्रुटी दाखवून दिल्या. याच दरम्यान आता भाजपा नेते अतुल भातखळकर (BJP Leader Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. 

"गोरगरिबांसाठी मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं" असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "गोरगरिबांच्या चुली पेटल्या पाहिजेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडले. लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगलेले लोक ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहेत म्हणून भीती वाटते, दुसरं काय?" असं अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 


 

Web Title: BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Maharashtra Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.